हरंगुळ यात्रे निमित तहसीलदार साहेब तहसील कार्यालय गंगाखेड यांना निवेदन,
गंगाखेड प्ककतिनिधी :- हरंगुळ येथील नागपंचमी यात्रा निमित्त वडगाव स्टे ते हरंगुळ रस्ता दुरुस्ती करणे रस्त्यातील झाडे झुडपे काढून देणे व रस्त्यातील खड्डे दुरुस्ती करून देणे बाबत व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे व मंदिर परसरातील साफसफाई स्वच्छ करून देणे व पोलीस बंदोबस्त देण्यात यावे,असे
निवेदन नेते रामेश्ववर बचाटे दिले आहे.
गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथील यात्रा मराठवाड्यातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा मानली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पहिले हप्त्यात नागपंचमीच्या दिवशी यात्रा भरते. या यात्रेला पुणे, मुंबई, बीड, परभणी ,नांदेड ,लातूर अशी प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात.हरंगुळ देवस्थान कमिटीवर सध्या आपणच प्रशासक असल्यान विनंती करण्यात येते. देवस्थानच्या परिसरात साचलेली घाण व परिसर स्वच्छ करून देण्यात यावा .यात्रा जवळ येऊन ठेपले असून सुद्धा स्वच्छता करण्यासाठी काहीच हालचाल केली नाही .भाविक भक्तांना यात्रेला येण्यासाठी रस्त्यावर वाढलेल्या झाडे झुडपे रस्त्याची दुरावस्था झाल्याने मोठी अडचण होणार आहे, या पार्श्वभूमीवर शासनाने रस्त्यावरील झाडे झुडपे काढणे महत्त्वाचे आहे प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे तसेच सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे तसेच परिसरात स्वच्छता करणे गरजेचे आहे परिसर स्वच्छ करून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना निवारा करणे गरजेचे आहे; महसूल विभाग गंगाखेड यांनी हरंगुळ देवस्थान यात्रा उत्सवात भाविकांची हेळसांड व गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी व गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबांनी यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त देण्याची कृपा करावी, अशी हरंगुळ देवस्थान येथील प्रतिष्ठानची मागणी आहे. तसेच वरील प्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध न झाल्यास या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील करिता विनंती करण्यात येत आहे,निवेदनावर रामेश्वर प्रभाकरराव बचाटे पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस परभणी,रमेश अण्णा खांडेकर माजी सरपंच धनगर मोहा,माणिक भोकरे ग्रामपंचायत सदस्य हरंगुळ,
वैभव वाव्हळे,नागेश भोकरे,प्रवीण जाधव,युवराज परांडे,
राम इंगळे.यांच्या सह्या आहेत

0 टिप्पण्या