महावितरण च्या हरंगुळ सबस्टेशन शाखेतील बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

महावितरण च्या हरंगुळ सबस्टेशन शाखेतील बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ संपन्न. 

हरंगुळ :- हरंगुळ सबस्टेशन शाखेतील बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ दिनांक ५ जुलै २०२३ रोजी उपकार्यकारी अभियंता श्री राख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
निरोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकाधिकारप्रमुख तथा हरंगुळ चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे आणि शाखा अभियंता भंडारे साहेब उपस्थित होते.
प्रारंभी याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता राख साहेब, लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे, शाखा अभियंता भंडारे साहेब यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
तसेच बदली झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.   
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपकार्यकारी अभियंता राख साहेब, प्रमुख पाहुणे लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळ चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे, शाखा अभियंता भंडारे साहेब यांची भाषणे झाली. 
ज्यांची बदली झाली आहे त्यानी व इतर कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.
बदली झालेले अधिकारी व कर्मचारी खालील प्रमाणे आहेत. 
१) श्री राख साहेब, उपकार्यकारी अभियंता लातूर ग्रामीण येथून पाटोदा जिल्हा बीड येथे बदली झाली आहे. २) श्री सय्यद साहेब, प्रधान यंत्रचालक हरंगुळ येथून मुरुड येथे बदली झाली आहे. ३) श्री कांबळे साहेब, यंत्रचालक नवीन एमआयडीसी हरंगुळ येथून तांदूळजा येथे बदली झाली आहे. ४) श्री मंडलिक साहेब, यंत्रचालक हरंगुळ येथून देवर्जन उदगीर येथे बदली झाली आहे. ५) श्री शेख बशीर साहेब, प्रधान तंत्रज्ञ हरंगुळ येथून ८ नंबर गरुड चौक, लातूर  येथे बदली झाली आहे. ६) श्री घंटे साहेब, वरिष्ठ तंत्रज्ञ हरंगुळ येथून गंगापूर शाखा येथे बदली झाली आहे.
७) श्रीमती गायकवाड मॅडम, वरिष्ठ तंत्रज्ञ हरंगुळ येथून रेणापूर सब डिव्हिजन येथे बदली झाली आहे. 

सदर निरोप समारंभ कार्यक्रमास हरंगुळ शाखेतील सर्व तांत्रिक कर्मचारी श्री. कोरडे साहेब, श्री शिंदे साहेब, श्री महाजन साहेब, श्री आंबीलपुरे साहेब, श्री शिरसाट साहेब, श्री राठोड साहेब, श्री काळे साहेब, श्री पांचाळ साहेब, श्री हाके साहेब, श्री होळकर साहेब, श्री शिरसागर साहेब, श्री खुदुस साहेब, श्री राजे साहेब, श्री भुरे साहेब, श्री शिंदे साहेब मळवटी, श्री सोनवणे साहेब, श्री बालू साहेब हरंगुळ, सौ मुजावर मॅडम, सौ फुलारी मॅडम, सौ शृंगारे मॅडम यांच्यासह व्यंकटराव मल्लिकार्जुन पाटील, ज्ञानेश्वर कोतवाड आदी ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते.   
उपस्थित मान्यवरासह सर्वांनीच सर्व बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या