आर्थिक क्रांती हेच समाजाच्या विकासाच मूळ- सखाराम बोबडे पडेगावकर

आर्थिक क्रांती हेच समाजाच्या विकासाच मूळ- सखाराम बोबडे पडेगावकर  

 
                           गंगाखेड प्रतिनिधी
             समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात आर्थिक क्रांती झाल्याशिवाय त्या समाजाचा विकासच होऊ शकत नाही, जिल्ह्यातील आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकाच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी  सामूहिक प्रयत्न करणार असल्याचे मत सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी गंगाखेड येथे व्यक्त केले. 
               आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा परभणी लोकसभेचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना गुरुवारी गंगाखेड येथे पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची निगडित असलेल्या mi लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड च्यावतीने समूह व्यवस्थापक TC हे मानांकन देऊन गौरविण्यात आले .
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे एकूणच विषमुक्त शेती विषमुक्त अन्न हे अभियान यशस्वी करून रासायनिक खत ,कीटकनाशक यांच्या वापरामुळे मानवी शरीर ,पाळीव प्राणी व जमीन या सर्व घटकावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल श्री व सौ अलका सखाराम बोबडे पडेगावकर या दोघांना गौरविण्यात आले. नॅशनल टीम कॉडणेटर अक्षय गोरटकर,RTC किशोर वागले यांच्या उपस्थितीत व परभणी जिल्ह्याच वारकरी संप्रदायाचे वैभव रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के यांच्या हस्ते यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते आगामी काळात परभणी जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या जीवनात आर्थिक उन्नती आणण्यासाठी आपण या अभियानाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न करत अशा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या सत्कार वेळी बालासाहेब अंबादास निरस, शेषराव आव्हाड ,दिगंबर बोबडे आदी सहकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या