कार्यसम्राट न्यूजचे अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना चे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष म्हेत्रे यांच्या हस्ते शानदार अनावरण.
सोलापूर जिल्हा प्ररतिनिधी :- गेली नऊ वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध घडामोडीवर नजर ठेवून निरपेक्ष निर्भीड सडेतोड परखड लेखन उत्कृष्ट मांडणी रोखठोक लेखन त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात नेहमीच आवाज उठवून सर्वसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यातील जनतेला परिचित असणाऱ्या पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून वृत्तपत्र व्यवसाय न समजता केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या 9 वर्षापासून साप्ताहिक कार्यसम्राट एक आगळा वेगळा वाचक वर्ग निर्माण केला आहे वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट नेहमीच जागल्याची भूमिका पाडली असून नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतली आहे याच साप्ताहिक कार्यसम्राट ने वृतपत्र बरोबर डिजिटल मीडियामध्ये प्रवेश केला असून कार्यसम्राट न्युज या नावाने पोर्टल सुरु केलं असून कार्यसम्राट न्युज या पोर्टलचे शानदार अनावरण पत्रकार सुरक्षा समितीचे मा पश्चिम महाराष्ट्र संघटक अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना चे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष दैनिक तुफान क्रांती चे शहर प्रतिनिधी संतोष म्हेत्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे
*साप्ताहिक कार्यसम्राटने वृत्तपत्राच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयावर सडेतोड लेखन उत्कृष्ट मांडणी निरपेक्ष निर्भीड लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून कार्यसम्राट ने आपली भूमिका बजावली असून सोलापूर शहर व जिल्ह्यात आपल्या लेखणीचा आगळा वेगळा ठसा उमटवला असून गेली नऊ वर्षापासून वृत्तपत्र चळवळ जागृत ठेवली आहे असं मत अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मेहत्रे यांनी व्यक्त केले आहे*
कार्यसम्राट न्यूज च्या अनावरण प्रसंगी संपादक यशवंत पवार धनंजय अनंतपुरकर यल्लालिंग स्वामी जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे इत्यादी उपस्थित होते.

0 टिप्पण्या