उमरगा येथे आर्केस्टा डान्स बारवर उस्मानाबाद पोलीसांचा छापा, 9 नाच्या मुलींची सुटका तर 35 जणांना अटक,तर 58 लाखाचा मुद्देमाल जप्त

उमरगा येथे आर्केस्टा डान्स बारवर उस्मानाबाद पोलीसांचा छापा, 9 नाच्या मुलींची सुटका तर 35 जणांना अटक,तर 58 लाखाचा मुद्देमाल जप्त..... 

उमरगा पोलीसांच्या अकार्यक्षमते मुळे उस्मानाबादचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एम. रमेश यांच्या पथकाची कार्यवाही..... 

प्रतिनिधी प्रवीण राठोड उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी उमरगा चौरस्ता जवळील लातूर रोडवरील सौदागर आॅर्किस्टा या डान्स बारवर राञी उशीरा छापा टाकून 9 नाच्या महिलांची सुटका करीत 35 जणांना अटक केली आहे. या रेडमध्ये तब्बल 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उशीरापर्यंत उमरगा पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती.

उमरगा शहरातील नामवंत राजकीय नाळ असलेले लोकसेवक, तसेच कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील आंबट शौकीन यांचा व विशेषतः युवा वर्गाचा यात समावेश आहे

उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, एम रमेश यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई केली जात आहे. 

उशीरा गोपनीय माहिती एम. रमेश यांना मिळताच उमरगा शहराजवळील जकेकूर चौरस्ता येथील लातूर रोड जवळील सौदागर आॅर्किस्टा बार येथे अवैध रित्या महीला नृत्यांगनावर पैसे उधळून अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी उशीरा जावून छापा घातला. या हॉटेलमध्ये सौदागर हॉटेल टेन लव्हर्स या नावाने कागदी नोटा बनवून उसळल्या जात होत्या. 

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर उमरगा पोलीसात उशीरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात कळंब येथील पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, उपनिरीक्षक पुजरवाड, सपोनि महेश क्षीरसागर यासह पोलीस पथकाचा समावेश होता. 

चौकटीचा मजकूर..... 

उमरगा शहरातील नामवंत राजकीय नाळ असलेले लोकसेवक, तसेच कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील आंबट शौकीन यांचा व विशेषतः युवा वर्गाचा यात समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या