प्रवीण राठोड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार सन्मानित

प्रवीण राठोड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार सन्मानित
 
जो कायद्याचा मान राखतो त्याचा आम्ही आदर करतो.
 
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज नेटवर्क द्वितीय वर्धापन दिन व गौरव पुरस्कार सोहळा जिल्हा धाराशिव येथे संपन्न....

महाराष्ट्र पोलीस टाईम्स द्वितीय वर्धापन दिनाच्या निम्मिताने जिल्हा धाराशिव यांच्या वतीने गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर गौरव पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र पोलीस टाईम्स चे मुख्य संपादक श्री. उमेशजी काळे साहेब,सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री संजय पाईकराव साहेब, नायब तहसीलदार श्री. राजाराम केलूरकर साहेब,
तुळजापूर तालुका पोलीस अधिकारी श्री. काशीद साहेब,असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर पिंक पथक प्रमुख सौ. देवकन्या मैदाड मॅडम, तुळजापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री संतोष पाटील साहेब, महात्मा फुले जनआरोग्य योजना समन्वयक मा. डॉ. विजयकुमार भुतेकर साहेब डॉ. निखिल क्षीरसागर साहेब, आदी मान्यवर उपस्थित होते..

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राची आई कुलस्वामींनी तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पुजन तथा दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात मांगल्याने केली...


महाराष्ट्र पोलीस टाईम्स गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निम्मिताने  धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट मा. मनीष वाघमारे साहेब यांनी व्यक्त केले..

महाराष्ट्र पोलीस टाईम्स चे मुख्य संपादक मा. उमेशजी काळे यांच्या वतीने सर्वं प्रमुख मान्यवरांचा समतेचा फेटा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...

महाराष्ट्र पोलीस टाईम्स द्वितीय वर्धापन दिन व गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निम्मिताने उपस्तित सर्वं प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले  यावेळी सर्वं मान्यवरांनी महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चे व मुख्य संपादक उमेशजी काळे यांच्या कार्याचे कौतुक केले व उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या अल्पावधित दहा हुन अधिक जिल्ह्यात कार्यालये स्थापन करून लोकशाही बळकट केलीत व पोलीस प्रशासन व सामान्य नागरिकांतील दुरावा दूर करण्याचे कार्य केल्यामुळे महाराष्ट्र पोलीस टाईम्स विशेष कौतुक मा. सौ. देवकन्या मैनंदाड मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.. उपस्थित आरोग्य अधिकारी यांनी शासन मार्फत असलेल्या योजणांची माहिती यावेळी दिली....

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मा. संदीप क्षीरसागर यांनी केले

यावेळी महाराष्ट्र पोलीस टाईम्स महाराष्ट्र राज्य सल्लागार पदी
ऍडव्होकेट विद्या साखरे व ऍडव्होकेट मनीष वाघमारे यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली 

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकार व प्रसारमाध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशेष सत्कारमूर्ती यांना महाराष्ट्र पोलीस टाईम्स सेवा गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले


1) अवघ्या आठ वर्षाचा बाल खेळाडू राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत पुणे येथे सुवर्ण पदक प्राप्त अरुनोदय जयंत फसके

2) जिल्हा रुग्णालय येथे परिसेविका म्हणून कोविड योद्धा कार्य गौरव म्हणून सौ. सुरेखा गवई

3) तेजस्विनी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून माती विरहित बाग प्रकल्प, वृक्ष संवर्धन कार्य करणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट  तेजश्री पाटील मॅडम..


4) वैकल्पिक वादविवाद निवारण केंद्र सदस्य, बाल न्याय मंडळ सदस्य विधीज्ञ ऍडव्होकेट अरुणा गवई मॅडम....

5) वयाची 75 पूर्ण केलेल्या व विविध शस्त्रक्रिया झालेल्या असताना देखील तरुणांना लाजवेल असा उत्सह असणाऱ्या आजही विधी सेवा करणाऱ्या ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट सौ. आशा टेळे मॅडम...

5) आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित महिला संरक्षणासाठी अँप तयार करून सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणी वैष्णवी घोगऱे मॅडम...


6) अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा अध्यक्ष कुलदैवत चे वार्ताहर श्री. किरण दासराव माळाले साहेब..

7) शैक्षणिक मार्गदर्शन करणारे प्रा. सोमनाथ लांडगे साहेब

आदर्श पत्रकार पुरस्कार देखील यावेळी प्रदान करण्यात आले


1) संतोष जाधव - TV9 
2) काकासाहेब कांबळे -ABP माझा कॅमेरामन
3) मंच्छिन्द्र कदम - दैनिक एकमत
4) विनोद बाकले - धाराशिव नामा संपादक
5) कैलास चौधरी - साम tv
6)अमजद सय्यद - झी 24 तास
7) देविदास पाठक आकाशवाणी
8) हुकमत मुलाणी टू डे समाचार
9) सुनील ढेपे धाराशिव लाईव्ह
10) प्रवीण राठोड विश्व 24 न्यूज

उमरगा विभाग
राहुल माने व विशाल देशमुख

धाराशिव विभाग

संतोष राजेंद्र दूधभाते धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

लातूर विभाग

चंद्रकांत हजारे 

आदी वार्ताहार प्रतिनिधी चा गौरव करण्यात आला....

सदर कार्यक्रमासाठी उपस्तिथ मान्य वारंचे आभार प्रदर्शन नानासाहेब मगर यांनी केले

पुरस्काराचे स्वरूप. शाल महाराष्ट्र संस्कृती भूषण समतेचा फेटा पुष्पगुच्छ व महाराष्ट्र पोलीस टाईम्स च्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला..

सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी धाराशिव जिल्हा महाराष्ट्र पोलीस टाईम्स प्रतिनिधी नी परिश्रम घेतले..






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या