केळशी येथील शाळेतील शिक्षिकां दिप्ती दत्तात्रय माळवदे यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

केळशी येथील दिप्ती दत्तात्रय माळवदे यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित 
दापोली प्रतिनिधी :- शिवजमोत्सवा निमित पंचायत समिती दापोली यांच्या वतीने 2022- 23 या सालचा  पंचायत समिती आदर्श शिक्षिका पुरस्कार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी दिप्ती दत्तात्रय  माळवदे यांना दापोली- मंडणगड तालुक्याचे  आमदार योगेश कदम यांचे शुभहस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी  या कार्यक्रमाला रायगड - रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे तसेच गटविकास अधिकारी  एम. आर. दिघे,गट शिक्षण आधिकारी आण्णासाहेब बळवंतराव , भगवानराव घाडगे, जीवन सुर्ले,  गणेश तांबोटकर,  सुनील खरात सहा.गटविकास अधिकारी , डॉ. किशोर जाधव तालुका आरोग्य अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी  दिघे  होते. या कार्यक्रमाचे आयोजन दापोली  येथील रसिकरंजन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.

सदरचा पुरस्कार हा दापोली  व्हिजन 4 व  इयत्ता ५ वी. शिष्यवृत्ती परीक्षांसाठी उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात आला आहे. 

 दिप्ती माळवदे यांना या अगोदर सातारा जिल्हयातील पाटण पंचायत समिती च्या वतीने दोन वेळा आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच 2019 मध्येही पंचायत समिती दापोली यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे.

 दिप्ती माळवदे यांना 2022 - 23  आदर्श शिक्षिका पुरस्कारामुळे केळशी परीसरातून सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या