पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे सरस्वती विद्यालय गंगाखेड येथे आयोजन.

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे सरस्वती विद्यालय गंगाखेड येथे आयोजन.


गंगाखेड प्रतिनिधी :- शहरातील सरस्वती विद्यालयामध्ये देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयी असणारी भीती व ताण तणाव कमी व्हावा या उद्देशाने,दिनांक 27 जानेवारी रोजी, परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण,गीता मंडळ या ठिकाणी दाखवण्यात आले.


 कार्यक्रमाचे आयोजन,भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम,शिक्षक आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोपाळ मंत्री,तालुका अध्यक्ष कृष्णा सोळंके व सरस्वती विद्यालय,यांच्या संयुक्त विद्यमानेया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील आठवी ,नववी व दहावीचे जवळपास 400 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले,चंद्रकांत आलापुरे,सुरेश लव्हाळे,राजेश लोंढे,अमोल राजूरकर,राजेश बोरीकर,अविनाश घोगरे, बालासाहेब सातपुते,मकरंद चिनके,भुवनेश्वरी निळकंठ, संघमित्रा भालेराव,शेषराव सरदार,अमोल जंगले,मधुकर खळीकर आदींनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या