पेठ शिवणीचा पशुधन बाजार महाराष्ट्रात नावलौकिक मिळवणार! -पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांचे प्रतिपादन!!

 पेठ शिवणीचा पशुधन बाजार महाराष्ट्रात नावलौकिक मिळवणार! -पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांचे प्रतिपादन!!                  

पालम प्रतिनिधी :- पेठशिवणीचा पशुधन बाजार महाराष्ट्रात नावलौकिक मिळविणार असल्याचे प्रतिपादन पालम तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांनी पशुधन बाजारांचे बैलजोडीचे पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रतिपादन केले .

पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथे सोमवार दिनांक 31 मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय पेठ शिवणी व गावकरी मंडळी यांच्या पुढाकाराने पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोमवारी पशुधनाचा आठवडी बाजारांचा  शुभारंभ कार्यक्रम मोठ्या  उत्साहाने आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानोबा वाघमारे, उद्घाटक पालम तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे ,प्रमुख पाहुणे पालम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे, पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, पेठशिवणी पशुवैद्यकीय अधिकारी बाळासाहेब डाखोरे, सेवानिवृत्त कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भस्के (कंडक्टर), पालम तहसील चे नायब तहसीलदार तेलभरे, उपसरपंच शिवाजीराव वाडेवाले ,मंडळ अधिकारी स्मिता बोंडारे मॅडम,  पोलीस बीट  जमादार कोलमवार ,ग्रामविकास अधिकारी संजीवनी सूर्यवंशी मॅडम आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते. 



कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालय पेठ शिवणी व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने उपस्थित मान्यवर मंडळीचे शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. 

यानंतर पशुधन बाजार शुभारंभ कार्यक्रमाचे मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांच्या शुभहस्ते  बैलजोडी पूजनाने व श्रीफळ फोडून करण्यात आल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे पोलीस पोलीस निरीक्षक सुरेश थोरात नायब तहसीलदार तेलभरे, उत्तमराव भस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

बाजारात पशुधन आणलेल्या  पशुपालक-  व्यापारी बांधवाचा दोस्ती टोपीआहेर व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. बाजारात पशुधनांना व शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती.  

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार भगवान करंजे यांनी सविस्तरपणे मांडले . पशुधन बाजारासाठी ग्रामपंचायत पेठशिवणी व समस्त गावकरी मंडळी मागील पंधरा दिवसापासून मोठ्या उत्साहाने पशुधन बाजार भरविण्यासाठी परिश्रम घेत होते.                      

पेठशिवणी पशुधन पहिल्याच बाजारात खरेदी-विक्री व्यवहारातून एंशी लाख रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा पशुपालक व्यापारी वर्गातून ऐकवल्या जात होती. एकंदरीत पशुधन बाजाराविषयी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या