गंगाखेड येथे प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासी दिन उत्साहात साजरा

 


गंगाखेड येथे प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासी दिन उत्साहात साजरा

               

प्रवासी व कर्मचारी यांच्यातील दुवा प्रवासी महासंघ :- गोपाळ मंत्री 



गंगाखेड प्रतिनिधी :-  रथसप्तमी व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक २८ जानेवारी रोजी प्रवासी महासंघ तालुका शाखा गंगाखेड व  ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेड येथे प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

सर्व प्रथम स्वामी विवेकानंद व बिंदू माधव  जोशी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले,यावेळी तालुकाध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी मनोगत व्यक्त करताना प्रवासी महासंघ हा कर्मचारी व प्रवासी यांच्यातील दुवा बनून सर्वांना सहकार्य करेल व सर्वांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. 


बस स्थानकावर परिवहन मंडळाचे सहायक वाहतूक अधीक्षक रामेश्वर हडबे ,सहायक वाहतूक निरीक्षक

माऊली मुंढे  तसेच उपस्थित बस चालक ,वाहक , सफाई कर्मचारी ,महिला ,पुरुष, शालेय विद्यार्थी आदी प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .रेल्वे स्टेशनवर  स्टेशन मास्टर अमरेश कुमार श्रीवास्तव , बुकिंग क्लर्क  सदाशिव सोळंके , आदित्य तिवारी, सचिन पट्टेकर, रेल्वे पोलीस मोतीराम काळे ,सतीश मिश्रा,सफाई कर्मचारी ,महिला व पुरुष प्रवासी यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष गोपाळ मंत्री,यांच्यासह प्रवासी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य अनंत काळे,नंदकुमार सोमानी,संजय बचाटे,अनिल साळवे,लक्ष्मण दुधाटे,केशव देशमुख,संजय सुपेकर, सोपान टोले,सुधाकर चव्हाण,संघटक सूर्यमाला मोतीपवळे, पद्मजा कुलकर्णी,प्रेमलता नावंदर,आशाताई रेघाटे,सुनिता घाडगे,आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या