दोन मोटारसायकलची समोरा समोर धडक झाल्याने अपघात, एकजण जागीच ठार तर एकजण गंभिर जखमी

 दोन मोटारसायकलची समोरा समोर धडक झाल्याने अपघात, एकजण जागीच ठार तर एकजण गंभिर जखमी 



गंगाखेड तालुका प्रतिनिधी :- गंगाखेड ते सोनपेठ मार्गावर महातपुरी जवळ दोन मोटारसायकलचा समोरा सोमोर धडक झालेल्या अपघातात विटभट्टी मजुर जागेवरच ठार झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभिर जखमी झाल्याची घटना दि.१७ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता घडली.मयत हा गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील राहणारा असून.महातपुरी जवळील विटभट्टीवरील  मजुर शेख अमिन शेख तय्यब वय ३४ वर्ष हा दुचाकी क्रमांक एम.एच.३८ एन.०७७१ ही दुचाकी घेऊन महातपुरीकडे येत होता तर,एम.एच.१३ बी.जे.२९९९ या क्रमांकाची दुचाकी घेऊन बळीराम राघोजी दणदणे राहणार आनंदवाडी हा आनंदवाडीकडे जात असताना,या दोघाच्या मोटारसायकलची महातपुरी जवळ समोरा समोर जोराची धडक झाल्याने या अपघातात शेख अमिन शेख तय्यब हा जागेवरच ठार झाला.दुसरा दुचाकीस्वार बळीराम राघोजी दणदणे गंभरी जखमी झाला.दणदणे याला डोक्याला आणी पायाला गंभिर मार लागला आहे.जखमीला परभणीच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

https://youtu.be/aqB0FQKMag0

   तालुक्यातील महातपुरी येथील मयत शेख अमिन शेख तय्यब हा त्याच्या परीसरातील विटभट्टीवर मजुर म्हणून कामाला होता.मयताच्या पश्चात पत्नी, सहा मुली, आई,वडील, चार बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या