प्रवासी दिनानिमित्त बसच्या चालक व वाहक यांच्यासह प्रवाशांचा सत्कार
पालम तालुका प्रतिनिधी :- पालम येथे महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ तालुका पालमच्या वतीने प्रवासी व एसटीबस चालक वाहकाचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
पालम येथील ममता विद्यालयाच्या सभागृहामध्ये प्रवासी महासंघाच्या वतीने, प्रवाशी दिनानिमित्त, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन, प्रवासी महासंघ पालम तालुकाध्यक्ष श्री माधव हणवते यांच्या संकल्पने प्रमाणे सर्व पदाधिकारी,बस थांबा पालम येथे आले व नांदेड बीड एसटी बसचे चालक व वाहक यांच्यासह प्रवाशांचा सत्कार करून,प्रवासी दिन मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला.
यावेळी प्रवासी महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष शांतीलाल शर्मा, तालुकाध्यक्ष माधव हानवते, सचिव बाबासाहेब एंगडे , संघटक बालासाहेब फुलपगार ,उपाध्यक्ष शंकर टाकळे, पत्रकार लक्ष्मण दुधाटे, भास्कर लांडे, धोंडीराम कळंबे, भगवान करंजे, बसचे चालक सय्यद मोसिन सय्यद मेहबूब, वाहक एस बी राऊत यांच्यासह प्रवासी बापूराव एडके,कांबळे,इंगळे सह प्रवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


0 टिप्पण्या