पन्नास वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या गंगाखेड मतदार संघाचा विकास केल्या शिवाय थांबणार नाही :- आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब

 


पन्नास वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या गंगाखेड मतदार संघाचा विकास केल्या शिवाय थांबणार नाही :- आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब


गंगाखेड प्रतिनिधी :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि संत जनाबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गंगाखेड नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या वतीने गंगाखेड मतदार संघाचा चेहरा मोरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत जवळजवळ गेल्या पन्नास वर्षापासून गंगाखेड मतदार संघामध्ये कसल्याच पद्धतीचा विकास झालेला नव्हता आणि त्या पन्नास वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्या करता आमदार साहेब गेल्या पाच वर्षापासून वाडी तांडा शहर वस्ती व ग्रामीण भाग अशा प्रत्येक भागाचा विकासा करता प्रयत्न करत आहेत... निश्चित येणाऱ्या काही दिवसात आमदार साहेबांनी दिलेल्या शब्दाची जाणीव ठेऊन, गंगाखेड पालम पूर्णा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला नंबर एकचा मतदार संघ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. त्या दृष्टीने मतदारसंघातील शेतकरी कष्टकऱ्यांचा प्रश्न असेल,मतदारसंघातील युवकांचा युवतींचा प्रश्न असेल, मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्न असेल, गाव तिथे स्मशानभूमी गाव तिथे रस्ते, गाव तिथे पांदण रस्ते त्याचबरोबर जलसिंचनाचे कामे असतील, लोकसभागृहाचे काम असतील, अशा अनेक प्रश्नावरती आमदार साहेब काम करत आहेत, याची प्रचिती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 


मतदारसंघातील सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक इत्यादी क्षेत्रांचा विकास व्हावा,याकरता प्रत्येक धार्मिक शैक्षणिक,सामाजिक सलोखा जपला जावा,या करिता प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन,आयोजकांना आपल्या उपस्थितीतून प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा काम करत आहेत. 


मित्रांनो आमदार साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य गंगाखेड पालम पूर्णा मतदारसंघासाची सेवा करण्यासाठी देण्याचं ठरवल आहे त्यामुळे जास्तीत जास्त विकास कसा खेचून आणता येईल यासाठी सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये,आमदार साहेबांनी प्रत्येक अधिवेशनामध्ये मतदारसंघाचे प्रश्न आपल्या बुलंद आवाज मध्ये मांडून, मतदार संघातील निवडणुकीपूर्वी मायबाप जनतेला दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केल्याशिवाय,आमदार साहेब आत्ता शांत बसणार नाहीत हे आपल्याला त्यांच्या दररोजच्या कार्यातून पहावयास मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या