जि.प.के.प्रा.शाळा चाटोरी येथे बालिका दिन उत्साहात साजरा

 जि.प.के.प्रा.शाळा चाटोरी येथे बालिका दिन उत्साहात साजरा



चाटोरी प्रतिनिधी :- दिनांक ३ जाने २०२३ रोजी जि प के प्रा शाळा चाटोरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांची जयंती सोहळा *बालिका दिन* म्हणून साजरा करण्यात आला.


 ़़़दव.वकार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे उच्च श्रे.मुख्याध्यापक  श्री राम चाटे सर हे होते ,प्रमुख उपस्थिती सौ.देशमाने मॅडम ,सौ.मनदुमले ताई, त्याचबरोबर शाळेतील शिक्षक वर्ग श्री बालासाहेब यादव सर,श्री.लुल्ला शेख ,श्री.बी.बी.होळकर,एस आर पिंपळे,श्रीमती प्रिता काळे मॅडम,श्री संदिप लांडगे सर व सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


     शाळेतील मुलींनी बालिका दिनाची तय्यारी करून विविध गीते,चारोळ्या भाषणे,सावित्रीची यशोगाथा सर्वांसमोर मांडल्या.व मुलींनी यशस्वी,सशक्त नारी बनून देशाच्या प्रगतीत आपली कर्तबगारी दाखवावी यावर मार्गदर्शन झाले.

      कार्यक्रमाचे सुत्र संचालन  वर्ग ७ वी ची  विद्यार्थीनी अंजली राजाराम किरडे हिने केले तर आभार एल सी शेख सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या