जयवंत रावजी पाटील यांना अधिवेशन काळात अन्यायकारक निलंबन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी येथे धिक्कार आंदोलन
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धिक्कार आंदोलन करण्यात आले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंतरावजी पाटील साहेब यांचा आवाज दाबण्याचा हेतूने हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सरकारने त्यांच्या केलेल्या अन्यायकारक निलंबनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच मा.श्री. जयंतरावजी पाटील साहेब यांचे निलंबन त्वरित मागे घेण्यात यावे यासाठी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कोल्हे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा किरण सोनटक्के जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोपाळ कच्छवे पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिलराव नखाते महिला जिल्हा अध्यक्षा सौ भावनाताई नखाते आलोक चौधरी गंगाधर यादव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..



0 टिप्पण्या