पेठपिंपळगाव ते पेंडु पाणंद रस्त्याचे उद्घाटन
पालम तालुका प्रतिनिधी/ अवधूत जाधव
पालम : तालुक्यातील पेठ पिंपळगाव ते पेंडू, या दरम्यानच्या शिव रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अशोकराव तात्यासाहेब शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना 2022 पासून राज्यात राबविली जाते. त्यात शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा, हा दृष्टिकोन आहे. प्रामुख्याने मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
ही योजना राज्यातील व गावात शेतरस्ते पांदन रस्ते तयार करण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतापर्यंत मजबूत व दैनंदिन कामासाठी वापरता येतील, असे शेतरस्ते, पाणंद रस्ते तयार करता येतात. अशा पाणंद रस्त्याचे पेठपिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालयमार्फत पेंडू शिवरस्ता ते पेठपिंपळगाव, या अंदाजे २ किलो मीटर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन पेठपिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अशोकराव तात्यासाहेब शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी माजी सरपंच काशिनाथराव शिंदे, उपसरपंच राजेश शिंदे, आबासाहेब शिंदे, दग्डोपंत शिंदे, उत्तम शिंदे, युवराज शिंदे, प्रतापराव शिंदे, गोविंद शिंदे, कैलास शिंदे ,बबनराव शिंदे, विजयकुमार शिंदे, आशिष जाधव, रोजगार सेवक राजधर भोसले, अनिल शिंदे, योगेश जाधव, विजय गाणार, विजय शिंदे, पत्रकार अवधूत जाधव आदी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या