भारतीय जनता पार्टी पालम तालुका उपाध्यक्षपदी सुरेश सोनटक्के यांची निवड

 भारतीय जनता पार्टी पालम तालुका उपाध्यक्षपदी सुरेश सोनटक्के यांची निवड



पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव

भारतीय जनता पार्टी पालम तालुका उपाध्यक्षपदी सुरेश देवराव सोनटक्के यांची निवड पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या हस्ते गंगाखेड येथील संपर्क कार्यालयात  नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

पालम तालुक्यात भाजपा बळकटीकरणासाठी वेळोवेळी पक्ष आदेशाच्या अधीन राहून विविध उपक्रम राबवून जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. नियुक्तीपत्र देताना भाजपाचे पालम तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे, जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी (आण्णा) टोले, तालुका सरचिटणीस भगवान करंजे अधिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या