जिंतूर येथील दहशतवाद विरोधी कक्षाच्या पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५९ हजार रूपये किंमतीचा ५.९ किलो गांजा जप्त
जिंतूर प्रतिनिधी लिंबाजी गिराम
जिंतूर तालुक्यातील आडगाव येथील योगेश हॉटेल व जिंतूर शहरातील जमजम कॉलनी येथे दहशतवाद विरोधी कक्षाच्या पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५९ हजार रूपये किंमतीचा ५.९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बेकायदेशीरपणे गांजा बाळगणा-या आरोपी जावेद खांन अ.वहिद खान वय ३२ वर्ष रा.जमजम कॉलनी जिंतुर व शंकर किसन दाभाडे वय ४२ वर्षे आडगाव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पो.नि.दिपक दंतुलवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला
पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याची माहिती काढुन केसेस करने कामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन जिंतुर हद्दीत दि.०४ मे रोजी रात्री १०.५५ वाजता परभणी पोलिस अधिक्षक कार्यालय दहशतवाद विरोधी कक्षाचे अधिकारी पोलिस निरिक्षक दिपक दंतुलवार तसेच अंमलदार जावेद खान, भारत नलावडे, सुनील राठोड, रामकिसन काळे, अरुण कांबळे, अझर पटेल, सय्यद जाकेर, आरेफ कुरेशी यांनी योगेश चहा हॉटेल आडगाव व जमजम कॉलनी जिंतूर येथे आरोपींच्या राहते घरी छापा टाकला असता कळीदार काळ्या रंगाचा उग्रवासाचा गांजा अवैधरीत्या विक्री करता बाळगल्याचे आढळून आले. या कारवाईत ५९ हजार रूपये किंमतीचा ५.९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी जावेद खांन अ.वहिद खान वय ३२ वर्ष रा.जमजम कॉलनी जिंतुर व शंकर किसन दाभाडे वय ४२ वर्षे आडगाव या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपिताविरुध पो.स्टे.जिंतुर येथे पोलिस निरीक्षक दिपक दंतुलवार फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस स्टेशन जिंतुरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास कोकाटे करीत आहेत.


0 टिप्पण्या