“शेतकऱ्याने शेतकऱ्यालाच बैल विकावा – कसायांकडे विक्री टाळा”— गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचे आवाहन


 “शेतकऱ्याने शेतकऱ्यालाच बैल विकावा – कसायांकडे विक्री टाळा”— गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचे आवाहन



नांदेड प्रतिनिधी :- गौरक्षक सेना शाखा नांदेडच्या वतीने मुदखेड येथील जनावरांच्या बाजारात गोवंश संरक्षण जनजागृती अभियान राबवण्यात आले. या बाजारात मोठ्या प्रमाणावर बैलजोड्यांची खरेदी-विक्री होत असल्याने, गोवंश कसायांकडे जाऊ नये यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले.

गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी बैलजोडी केवळ शेतीसाठीच विकत घ्यावी व विकावी. गोमाता, नंदीबैल आणि गोवंशाचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना चारा-पाणी सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. तसेच प्रत्येक बाजारात पाण्याचे तळवटे तयार करण्याची मागणी करण्यात आली

या कार्यक्रमात गोपालक शिवा जानोळी, आदिनाथ मोरे, राजरत्न रणवीर यांच्यासह परिसरातील शेतकरी, व्यापारी, गोसेवक व पशुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या