पालम तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इशारा; प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर निवेदन सादर.
बातमीतील फोटो प्रतिकात्मक आहेपालम प्रतिनिधी:-पालम तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी करत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर.
या निवेदनात केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशांनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून बीएलओची कामे,तसेच मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेत जबरदस्तीने काम देणे थांबवावे,
अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रवास भत्ता, इंधन भत्ता, मानधन, सीबीई अनुदान, भाडे आणि इतर देयके तातडीने अदा करावीत,
अंगणवाडीतील सर्व कामे ऑनलाइन झाल्यामुळे मोबाईल, इंटरनेट आणि रिचार्जचा वाढलेला खर्च शासनाने उचलावा, प्रत्येक अंगणवाडीत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच नवीन मोबाईल उपलब्ध करून देण्यात यावी,अनावश्यक रजिस्टर बंद करून आवश्यक रजिस्टर शासनाने उपलब्ध करून द्यावीत, टेक होम रेशनऐवजी ताजा गरम आहार किंवा कोरड्या धान्याचा पुरवठा करावा, तसेच त्याचे वितरण दर महिन्याला नियमित व्हावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षिका पदभरतीसाठी वयोमर्यादा ५५ वर्षांपर्यंत वाढविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय लाभार्थ्यांसाठीचे सर्व साहित्य वेळेत अंगणवाड्यांपर्यंत पोहोचविणे आणि पतसंस्थेच्या कर्जकपातीचा प्रश्न सोडविण्याची मागणीही करण्यात आली आहे.या सर्व मागण्यांसाठी,पालम येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात अंगणवाडी कर्मचारी एकत्र येणार असून, त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले,या निवेदनावर जिल्हा संघटक विनोद बाबाराव आवरगंड पाटील यांनी स्वाक्षरी केली असून, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.या बाबतीत शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या