NMMS प्रणालीतील अडचणी तसेच विविध प्रलंबित मागण्यांबाबत ग्राम रोजगार सहाय्यकांची नाराजी व्यक्त
जिंतूर प्रतिनिधी:-जिंतूर तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पंचायत समिती जिंतूर येथे ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने NMMS प्रणालीसह विविध मागण्यांवर बहिष्कार टाकण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
📍 पंचायत समिती कार्यालयीन अधीक्षक मा. उमेश गायकवाड साहेब यांच्या मार्फत हे निवेदन मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती जिंतूर, जिल्हा परभणी यांना देण्यात आले.
👉 ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने NMMS प्रणालीतील अडचणी तसेच विविध प्रलंबित मागण्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
👉 मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या वेळी ग्राम रोजगार सहाय्यक सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली आणि प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली.


0 टिप्पण्या