पालम पोलिसांच्या प्रतिष्ठेला उतरती कळा, दिवसा ढवळ्या लुटमार होते चोरच रचतात सापळा,पुयणी रोडवर दिवसा चोरीची घटना.

 पालम पोलिसांच्या प्रतिष्ठेला उतरती कळा, दिवसा ढवळ्या लुटमार होते चोरच रचतात सापळा,पुयणी रोडवर दिवसा चोरीची घटना.


पालम प्रतिनिधि

 येथील पोलिसांना धाक चोरट्यांवर राहिला नसून आता दिवसा ढवळ्या चोरी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे शनिवारी (ता.५) सकाळी 10 वाजता एका 75 वर्षीय वृद्धास पालम शहरातील पुयणी रोडवर चोरट्यांनी लुटले. अशा स्वरूपाच्या घटना तालुक्यात वाढल्याने पालम पोलिसांचा नाकार्तेपणा चव्हाट्यावर आला आहे.

मागील सहा महिन्यात दोन मोठे दरोडे, बनावट नोटा आणि नियमित अवैध वाळू वाहतूकीच्या घटना पालम तालुक्यात वाढल्या आहेत. त्यातून पालम पोलिसांचा धाक कमी झाल्याचे दिसते. म्हणून चोरांचा सुळसुळाट पालम तालुक्यात झाला आहे. आता शनिवारी (ता.5) पालम शहरातील पुयणी रोडवर चोरीची घटना झाली. पालम येथील मुलास भेटण्यासाठी आलेल्या रामराव हिराजी आवरगंड (वय 75, रा.सिरपूर, ता.पालम) यांना चोरांनी लुटले. दुचाकीवरून आलेल्या या चोरट्यांनी श्री. आवरगंड यांना पोलिस असल्याची बतावणी केली. पहिल्यांदा चोरट्यांनी त्यांच्या अंगाची झडती घेतली. त्यानंतर खिशातील पैसे काढण्यास सांगितले. त्याला नकार दिल्यावर खिशात गांजा असल्याचे चोरट्यांनी श्री. आवरगंड यांना सांगितले. मग खिशातून काढलेले 15 हजार रूपये घेवून चोरटे दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर रामराव आवरगंड यांनी पालम पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. भरवस्तीत चोरीची घटना घडल्याने पालम तालुक्यात भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे. कारण दरोड्याच्या घटना तालुक्यात वारंवार होत आहेत. नियमीत चो-यांचे प्रकरणे तर कित्येक होत आहेत. त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पालमला येवून करावा लागत आहे. प्रत्येक दुस-या घटनेत एलसिबीची कारवाई पालमला होत आहे. त्यामुळे पालम पोलिसांचे नेटवर्क कमजोर झाले असून त्यांचा जरबही राहिलेला नाही. आता वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष दिले नसल्यास तालुक्यात पोलिसांचा वचक राहणार नाही.अशी जनसामान्यातून चर्चा केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या