श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी भक्ती भावात साजरी

 श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी भक्ती भावात साजरी 

पालम :- येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत अखंड नामजप व यज्ञ सप्ताह मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.

 आज शनिवारी दिनांक 26 एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता झाली. सकाळी साडेदहा नंतर आरती व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी आरती व महाप्रसादाचा लाभ भक्तीमय वातावरणात घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या