सेवानिवृत्तीचा जाहीर सत्कार व कृतज्ञता सोहळा
पालम प्रतीनिधी :- पालम पंचायत समीतीला पुर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी बरेच वर्ष झाली भेटत नव्हते त्यामुळे सर्व शैक्षणिक कामे व शैक्षणिक योजना यांची अंमलबजावणी करण्यासाठी बर्याचशा अडचणी येत होत्या मागील काही काळापासून तालूक्यातील भुमीपुत्र जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम मा श्री शिवाजीराव गायकवाड यांची मा मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पालम पदाचा अतिरिक्त पदभार श्री गायकवाड यांना दिल्याने तालूक्यातील सर्व कामे वेळेत होत होती.
सर्व शाळांना भेटी देवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून सर्व शाळेत पुर्ण शासकीय योजना पोहचवीने या साठी ही श्री गायकवाड यांनी कार्य केले. शिक्षक वृंद व पालक विद्यार्थी यांचे साठी श्री गायकवाड म्हनजे हक्काचे आणि कोणाचीही आडवाअडवी न करता भेटेल तिथे कामे करून सर्व प्रश्न जागीच सोडविणारे गायकवाड साहेब आता सेवानिवृत्त होत आहेत याचीही खंत आप्तस्वकीय मित्रपरिवार शिक्षक वृंदात आहे. आणि एक तालुक्यातीलच पुर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी मिळाला या मुळे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्यात आनंदाचे वातावरण होवून तालूका सर्व शैक्षणिक कामात जिल्ह्यात पहीला क्रमांक आला परवा जिल्हा शैक्षणिक आढावा मध्ये उच्च स्तरीय अधिकारी यांनी श्री गायकवाड यांचे कौतुक करून सत्कार करून शुभेच्छा ही दिल्याचे समजते.. असे असतानाच*श्री गायकवाड साहेब ३०एप्रील २०२५रोजी सेवानिवृत्त होत आहेत. पुढे कार्यतत्पर श्री गायकवाड गटशिक्षणाधिकारी यांचे नंतर पालम गटशिक्षणाधिकारी पदाची कोण धुरा सांभाळणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे*
*(३०एप्रील रोजी जाहीर सत्कार*)
*पालम पंचायत समिती चे कर्तव्यदक्ष, सर्व समावेशक, सर्वांना सोबत घेवून तालूक्याची शैक्षणिक प्रगती कशी होईल या साठी आहोरात्र प्रयत्नशिल रहाणारे गटशिक्षणाधिकारी तथा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम चे श्री शिवाजी सायबू गायकवाड साहेब सेवानिवृत्त होत असल्याने त्यांची शिक्षण विभाग पालम, सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगीनींच्या व मित्रपरिवार यांचे वतीने त्यांचा यथोचित जाहीर सत्कार करून त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी सर्वांच्या वतीने या पालम तालुक्यातील कर्तव्यदक्ष भुमीपुत्रास शुभेच्छा, शुभकामना देण्यात येणार आहेत या करीता गटसाधन केंद्र पालम येथे दि ३०एप्रील २०२५रोजी सकाळी 11:००वाजता हा सोहळा तालूक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बांधव यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी पालम तालुक्यातील सर्व शैक्षणिक क्षेत्रातील मित्रपरिवार अधिकारी पदाधिकारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी जाहीर विनंती आयोजन समिती गटसाधन केंद्र पालम, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचे वतीने करण्यात येत आहे*



0 टिप्पण्या