कु. स्वाती गिनगिनेचे एमपीएससी परीक्षेत यश, महसूल सहाय्यक पदी निवड, पुयणी येथील गावकरी मंडळी कडून जंगी स्वागत.
पालम प्रतिनिधी :- तालुक्यातील पुयणी येथील कु.स्वाती भागवतराव गिनगिने यांची दिनांक 17 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या यादीत,महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याची वार्ता कळताच सर्व गावकरी,आआप्तेष्ट,सगे सोयरे व मित्रपरिवारा कडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव झाला. व गावातील प्स्वाप्रवेशद्वारावर बॅनर लावण्यात आले.निवड झाल्यानंतर औरंगाबाद येथून गावी असता,गावकऱ्यांच्या वतीने,रविवारी पुयनी येथे गावात प्रवेश करताच,अंगावर फुलाचा वर्षाव करून फटाक्याची आतिषबाजीने स्वागत केले. गावातील सर्व लहान-मोठे,महिला,पुरुष एकत्र येऊन सर्वांनी हार फुलांचे गुच्छ देऊन तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला. यावेळी गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गरीब कुटुंबातील आई-वडील निरक्षर पण मुलगी कर्तुत्ववान आपल्या अभ्यासाच्या जीवावर एमपीएससी परीक्षेत यश मिळवून महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याने गावकऱ्यांनी तिचे स्वागत करून आनंद साजरा केला मंदिराजवळ स्वागत करून गावकऱ्यांनी पेढे वाटून ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिष वाजित तिला आपल्या घरी आणले.


0 टिप्पण्या