पालकांनी पाल्यांच्या प्रगतीचा नेहमी आढावा घेणे काळाची गरज:- गटशिक्षणाधिकारी भगवानराव ठुले यांच प्रतिपादन
मरडसगाव झेड.पी. शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न
गंगाखेड प्रतिनिधी :- मरडसगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमीक शाळेत,दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी,भव्य असा पालक मेळावा संपन्न झाला,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी,शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, शितलताई कांबळे होत्या,तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक,पंचायत समिती गंगाखेडचे गटशिक्षणाधिकारी, माननीय श्री भगवानराव ठुले साहेब उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री नानजकर सर,श्री गंगाधरजी कांबळे,श्रीमती शिवकन्याताई रामेश्वरजी जाधव आदी मान्यवर या मेळाव्यात विचार मंचावर उपस्थित होते.यावेळी
श्रीमती काळे मॅडम,श्री किरडे सर, गंगाधरजी कांबळे,काही पालक वर्ग यांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पालकांकडून आढावा घेऊन,पालक वर्गांशी संवाद साधताना,श्रीमान भगवानरावजी ठूले साहेब यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शिक्षकांशी समन्वय साधावा,कारण आपला पाल्य हीच आपली संपत्ती व ओळख आहे हे पालकांनी समजून,शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेऊन,पाल्याच्या गुरूजनांच्या संपर्कात राहून,आपला मुलगा असो वा मुलगी शाळेत जाऊन काय प्रगती करतात,याची माहिती मिळवून त्यावर उपाय योजने काळाची गरज आहे,असे जाहीर आवाहन,माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी,उपस्थित पाल्यांचे माता पिता व पालक यांना केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ब्रह्मानंद किरडे सर यांनी केले तर, प्रास्ताविक श्री कुंडगीर सर यांनी केले,तसेच आभार श्री रंगनाथ चव्हाण सर यांनी मानले,या पालक सभेस मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्याचे आई,वडील व पालक वर्ग उपस्थित होते,यावेळी माता पालकांची संख्या विशेष उपस्थित होती,या कार्यक्रमा साठी,श्री संदीप दयाळ सर,श्री महेश पुरी सर,श्रीमती मिरजगावे मॅडम व इतर सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले



0 टिप्पण्या