सायबाचे नाव सांगून, होमगार्डाने केली कला,दहा हजार रुपयांसाठी लाचखोर गजाआड गेला.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सकलेश बाभुळगावकर :- सविस्तर वृत्त - सोलापूर ग्रामीण मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत होमगार्ड, आरोपी श्री दत्तात्रेय अण्णाराव मोटे वय वर्षे ३६, राहणार नांदगाव तालूका मोहोळ जिल्हा सोलापूर, यांनी चक्क मोठ्या सायबाचे नाव सांगून, तक्रार दाराच्या पतीच्या जमानतीसाठी, १५,००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १०००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्याने गुन्हा दाखल.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिट,पुणे परिक्षेत्र.
मोहोळ पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया झाली असून.नांदगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापू येथील तक्रारदार महिलेचे पती विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक असल्याने, लवकर जमानत मंजूर करून,व गुन्ह्यातील गाडी न दाखविता, जमानत करण्यासाठी साहेबांचे नाव सांगून,पंधरा हजार रुपये लाच मागितली पण तडजोडी अंती दहा हजार रुपये लाच घेतल्याचे मान्य करून,घैतलेली दहा हजार रुपये रोख रक्कम स्वीकारल्याने,पडताळणी दिनांक १८ जानेवारी २०२३ व सापळा दिनांक १८.जानैवारी २०२३ रोजी,भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ (अ) प्रमाणे. श्री. दत्तात्रय आण्णाराव मोटे, वय ३६ वर्षे, पद होमगार्ड मोहोळ पथक यांना ताब्यात घेऊन, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,
ही कारवाई श्री. अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, एसीबी पुणे यांच्या आदेशावरून,व श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली,सापळा पथक,श्री. गणेश कुंभार,पोलीस उपअधीक्षक,एसीबी सोलापूर.श्री.चंद्रकांत कोळी,पोलीसनिरीक्षक,एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार,पोलीस नाईक प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, पोलिस कॉन्स्टेबल सलीम मुल्ला, चालक पोलीस शिपाई शाम सुरवसे व सर्व नेमलेले एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येतेकी,भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.संपर्क पत्ता पोलीस उपअधीक्षक ऑंटीकरप्शन ब्युरो सोलापूर,

.jpeg)

0 टिप्पण्या