हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पाथरूडमध्ये उत्साहात साजरी.

 हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पाथरूडमध्ये  उत्साहात साजरी.


भूम तालुका प्रतिनिधी :- तालुक्यातील पाथरूड येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.

गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत समोरील मैदानावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या व आझाद हिंद सेनेचे थोर पुरुष सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायतचे सरपंच व पंचायत समिती सदस्य तसेच विविध विकास सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

शिवसेना युवासेना शाखा पाथरूड यांच्या वतीने,केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ आधीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख  स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण व 20% राजकारणक यानुसार आजपर्यंत तळागापर्यंत शिवसेना काम करत आलेली आहे.

शिवसेना संघटना ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना आहे व आगामी काळात सुद्धा त्याच ताकतीने उद्धव ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळापर्यंत सर्वसामान्यांची काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करील असा विश्वास शाखेंच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केला.

याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,शिवसेना विभाग प्रमुख श्री गजेंद्रजी खुणे,शिवसेना शाखाध्यक्ष वासुदेव बोराडे, सरपंच शिवाजीराव टिकटे,उपसरपंच तानाजी बोराडे,विविध विकास सोसायटी चे चेअरमन धनंजय बोराडे,व्हॉइस चेअरमन संदीपान काका पवार,ग्रामविस्तार अधिकारी भागवत राठोड,बँकेचे व्यवस्थापक रामगुडे दीपक,ग्रामपंचायत सदस्य श्री बप्पा पवार,धोंडीबा टिळक, शहाजी आठवले,युसूफ तांबोळी, अशोक भसाड,सेवक टिकते,प्रदीप खुणे,युवा उद्योजक भाऊसाहेब बोराडे,अनिल टिकटे,योगेश टिकटे,सोमनाथ गावडे,संतोष गजरे,महादेव टिकटे,आण्णासाहेब पवार,नीलकंठ बोराडे,संजय वडेकर,विष्णू साठे,अंकुश आबा बोराडे,लहू बोराडे,सदानंद गिरी,महादेव गव्हाणे,शिवाजी बोराडे,नारायण पखाले,प्रकाश बोराडे,आश्रुबा शेळवने,संतोष गजरे,संदीप पढघम,शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर,गायकवाड सर, कुलकर्णी सर,लोहार सर व तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारि व इतर कर्मचारी वृंद,ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक अशोक बोराडे नागेश पवार,विलास जाधव योगेश बोराटे सह गावातील इतर जेष्ठ नागरिक,शिवसैनिक युवासैनिक व विद्यार्थी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या