पोलीस हक्क संरक्षण संघटना महीला आघाडी जिंतूर तालुकाध्यक्ष पदी सौ राजश्री देबाजे यांची निवड.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- पोलिस हक्क संरक्षण संघटनेचे जिल्हा सह सचिव गुलाबराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिंतूर येथे दिनांक 18 जानेवरी 2023 रोजी दुपारी12:30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस मुख्य मार्गदर्शक म्हणुन पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते विनोदअण्णा भोसले तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक सचिव श्री शेषराव सोपणे मामा, गंगाधर यादव, दत्ता कदम व माणिक भालेराव आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
पोलीस हक्क संरक्षण संघटना ही पोलिसांच्या समस्या सह महिलांच्या न्याय हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लोकशाही मार्गाने आवाज उठविणार असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
पोलीस हक्क संरक्षक संघटनेमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देवुन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मत उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थापक सचिव तथा जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल चे संपादक श्री शेषराव सोपने मामा यांनी व्यक्त केले.
या बैठकीस जिंतूर तालुक्यासह पंचक्रोशीतील महिला व नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती.
जिल्हा सहसचिव गुलाबराव शिंदे यांच्या शिफारशी नुसार सौ राजश्री विशालराव देबाजे यांनी आत्ता पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थापक सचिव शेषराव सोपने मामा यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड..साहेबानी केले तर, प्रस्ताविक श्री शिंदे व आभार प्रदर्शन श्री देशोन्नती प्रतिनिधी यांनी केले.

.jpg)
.jpg)
.jpg)
0 टिप्पण्या