स्वराज्य रक्षक छत्रपती राजे संभाजी महाराजरा ज्यअभिषेक दिन तिळगुळ वाटप करून साजरा
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- स्वराज्य रक्षक छत्रपती राजे संभाजी महाराज राज्यअभिषेक दिनानिमित्त अभिवादन पूजन सोहळा व तिळगुळ वाटप करून राज्याभिषेक दिन साजरा सत्कार सोहळा 16 जानेवारी रोजी गंगाखेड नाका जेसीबी पॉईंट येथे राष्ट्रजन फाउंडेशन परभणी व जेसीबी चालक-मालक संघटना परभणी तर्फे संपन्न
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयटक संघटनेचे कॉम्रेड मुगाजी बुरुड, उद्घाटक -जेसीबी चालक-मालक संघटनेचे सदस्य शिवाजी सर्जे पाहुणे जेसीबी चालक संघटनेचे पदाधिकारी दिलीप सूर्यवंशी, प्रदीप गडदे, नागेश लंगोटे, समीर सय्यद, शेख अब्दुल्ला,अंकुश देवकते , ट्रॅक्टर चालक इसराइल शेख, आदिजन उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर (राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर याप्रसंगी कॉम्रेड मुगाजी बुरुड सर व जेसीबीऑपरेटर धुराजी मांजरे त्यांना सन्मानचिन्ह पत्र गौरव सत्कार करण्यात आला सर्वांना तिळगुळ वाटप करण्यात आले अशी माहिती जेसीबी चालक-मालक संघटनेचे मराठवाड्याचे संपर्कप्रमुख लोकसेवक नितीन जाधव महाराज गोगलगावकर त्यांच्या वतीने पत्रकार द्वारे माहिती देण्यात आली छत्रपती संभाजी महाराज की जय ही घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला


0 टिप्पण्या