ग्रामीण भागातील फिरत्या जनावरांसाठी तात्काळ उपाययोजना करा – गौरक्षक सेनेची मागणी
परभणी प्रतिनिधी :- परभणी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील फिरत्या गोमाता, नंदीबैल व पशुपक्ष्यांसाठी पाणी, चारा व संरक्षणाची तात्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी गौरक्षक सेना मराठवाडा अध्यक्ष नितीन जाधव यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
प्लास्टिक बंदी, प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती स्थापन, गोसंवर्धन उपाययोजना व कत्तलखाने बंद करण्याचीही मागणी करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात फिरणाऱ्या गोमाता, नंदीबैल तसेच इतर पशुपक्ष्यांसाठी पाणी, चारा व संरक्षणाची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी गौरक्षक सेना मराठवाडा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
पाथरी विधानसभा आमदार राजेश विटेकर यांच्या प्रतिनिधीमार्फत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती श्रीकांत विटेकर यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन गौरक्षक सेना मराठवाडा अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी सादर केले.
प्रमुख मागण्या
फिरत्या जनावरांसाठी पाण्याचे हौद, पानवटे व चारा व्यवस्था
प्लास्टिक मुक्त अभियान व प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी
प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा समितीची तात्काळ स्थापना
गोसेवक, गोरक्षक व गोपालकांना ओळखपत्र (ID) देणे
कत्तलखाने तात्काळ बंद करणे
गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी
गोमातेला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी
पशुपक्षी व प्राण्यांच्या संरक्षणासाठी विशेष सुविधा उभारणे
या सर्व मागण्या केंद्र व राज्य सरकारने तात्काळ अमलात आणाव्यात, यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा आयोग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गौरक्षक सेना – राष्ट्रजन प्राणिमित्र पशुसंरक्षण अभियान फाउंडेशन तसेच कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या वतीने अध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर यांनी ही माहिती प्रसिद्ध केली.
मोठी मागणी!
फिरत्या जनावरांसाठी पाणी-चारा व्यवस्था करा,प्लास्टिक बंदी तात्काळ लागू करा,प्राणी संरक्षण समिती स्थापन करा,कत्तलखाने बंद करा,गोसेवकांना आयडी द्या,गौरक्षक सेना मराठवाडा यांचे प्रशासनाला निवेदन



0 टिप्पण्या