थंडी सुटली, परतीच्या पावसामुळे रब्बी पिक पेरणी हंगाम लांबणीवर.
मुनीर शाह बाजार सावंगी :- बाजार सावंगी व परिसरात नाही नाही म्हणता अखेर थंडी सुटली असुन सकाळी सकाळी थंडी लागत असल्याचे चित्र बाजार सावंगी व परिसरात जाणवत आहे.
तर परतीच्या पावसामुळे रब्बी पिक हंगाम लांबणीवर पडला असल्याचे चित्र आहे. यंदा वेळेवर आणि चांगले पाऊसमान असले तरी शेवटच्या टप्प्यात व परतीच्या पावसामुळे रब्बी पिक हंगाम
लांबणीवर पडला आहे. तर यंदा नाही नाही म्हणता पावसाने सरासरी ओलांडली आहे. परतीच्या पावसामुळे सर्वत्र शेत जमिनीत ओलावा व वाफ नसल्याने रब्बी पिक हंगाम कामात व्यत्यय येत आहे. तर
कुठे कुठे शेतजमीन कोरडी असल्याने शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. काही ठिकाणी तर उगवणी झाली आहे. गहु मका ज्वारी . बाजरी .करडई हरभरा आदी रब्बी पिकं बाजार सावंगीत व परिसरात घेण्यात येतात विशेष करुन ग्रामीण क्षेत्र शाळु
ज्वारीचे रान आहे व ते रब्बी पिक हंगामासाठी राखीव ही ठेवतात. मात्र यंदा परतीचा पावसाने लावून धरल्याने रब्बी पिक हंगाम लांबणीवर पडला आहे तर थंडी ही उशीरा ने सुटत आहे. आक्टोबर मध्ये सुटणारी थंडी नोव्हेंबरमध्ये सुरु झाला तरी उकडाच जाणवत आहे. परंतु रात्री व सकाळी सकाळी थंडी लागत असल्याचे चित्र आहे. पण पाहिजे तशी थंडी अद्याप सुटली नाही. हे विशेष.
0 टिप्पण्या