प्रभारी.राज .नेमणुकी .दरम्यान गौडबंगाल,विविध दस्त नोंदणीची चौकशी करा,नागरिकांची मागणी, खुलताबाद दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार....

 'प्रभारी.राज .नेमणुकी .दरम्यान गौडबंगाल,विविध दस्त नोंदणीची चौकशी करा,नागरिकांची मागणी, खुलताबाद दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार.......



मुनीर शाह बाजार सावंगी/खुलताबाद प्रतिनिधी :-खुलताबाद तालुक्यांच्या विविध दस्त नोंदणी साठी येथे दुय्यम निबंधक कार्यालय असून ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज बदलून-बदलून आल्याने या मागचे गौडबंगाल .



विविध दस्त नोंदणी व्यवहार कामकाजाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

सर्वाधिक महसुल मिळवून देण्याची ख्याती असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात बदलून बदलून दुय्यम निबंधक येत असल्याने दैनंदिन व्यवहार कामकाजावर परिणाम होत असून याचा

मोठा फटका नागरिकांना बसला आहे. तालुका व शहरासाठी कार्यालयात विविध गावांतील दस्त नोंदणीचे कामकाजाचे व्यवहार याठिकाणी होतात. या कार्यालयात जमीन, घर, सहन जागा याबाबतचे खरेदीखत, बक्षीसपत्र, गहाण खत, वाटणीपत्र मुल्यांकन, मृत्यूपत्र यासह विविध दस्त नोंदणी होते. यासाठी अनेक गावातील नागरिक मोठ्या अंतरावरून या कार्यालयात येतात. मात्र, कार्यालयातील दुय्यम निबंधक अधिकारी कर्मचारी दुपारी उशीराने पोहचतात. त्यानंतर घाई गडबडीत दस्त नोंदणी करून पुन्हा कार्यालय बंद करण्याची घाई करतात. यात काम करणारे व काम करून घेणाऱ्यात मोठी धावपळ होते. व काम करुन घेणाऱ्या नागरिकांत स्पर्धा होत असल्याने वादविवाद घडत आहेत. त्यातच कायमस्वरूपी दुय्यम निबंधक नसल्याने व बदलून-बदलून निबंधक येत असल्याने कार्यालयातील दैनंदिन

कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या कार्यालयात शासनाकडून दुय्यम निबंधक म्हणून सुपेकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आपली प्रतिनियुक्ती मुंबई येथे करुन घेतली. त्या रिक्त जागेवर दु. नि. संतोष पवार यांना नियुक्ती होत नाही तोच त्यांची बदली सोयगाव येथे झाल्याने प्रभारी म्हणून दिपक इंगोले यांची नियुक्ती झाली. त्यांचीही बदली फुलंब्री येथे झाली. त्यांच्या जागी दीपक जाधव यांची नियुक्ती केली असता त्यांनीही दोन दिवस कार्य केले व पुन्हा नवीन दुय्यम निबंधक देण्यात आले. येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सतत नवीन बदलून बदलून अधिकारी येत असल्याने या मागचा.गौडबंगाल. नेमका काय गोंधळ सुरू आहे 

हे समजेनासे झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत झालेल्या प्रभारी राज व याकाळात झालेल्या दस्त नोंदणी कामकाजाची 

चौकशी .औरंगाबाद जिल्हाधिकारी. स्वामीं साहेबांनी स्वतःहा करावी.

अशी मागणी खुलताबाद शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या