रब्बी पेरणी सुरू, खर्चात भरमसाठ वाढ,शेतीचे बजेट कोलमडले, गहू ,हरबरे ज्वारी. बाजरी. बियाणांचै दर वाढले....

 रब्बी पेरणी सुरू, खर्चात भरमसाठ वाढ,शेतीचे बजेट कोलमडले, गहू ,हरबरे ज्वारी. बाजरी. बियाणांचै दर वाढले.... 



प्रतिनिधी मुनीर शाह बाजार सावंगी/,खुलताबाद :- खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी व परिसरात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा .ज्वारी. बाजरी.

पेरणीला, कांदा लागवडीला शेतकरी पसंती देत आहेत. परंतू यंदा पेरणी खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार असल्याचे दिसते.


यंदा संततच्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर आदी


पिकांचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन पीक कसेबसे जगले, मात्र उत्पादनात घट झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता रब्बीतील पेरणीचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांची पैशांची जुळवाजुळव करणे सुरू आहे, यात त्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे. कापसाला मिळणार सध्याचा दर परवडणारा नसल्याने काही शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवून खासगी कर्ज, तर काहींनी उसनवारी करून पेरणी सुरू केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या