रेशन कार्ड चे ekyc प्रत्येक घरी जाऊन रेशन दुकानदार यांनी करून घ्यावे.लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.
लातूर प्रतिनिधी :- रेशन कार्ड चे ekyc करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. हे इकेवायसी केल्याशिवाय कार्डधारकांना यापुढे रेशन मिळणार नाही.
त्यासाठी रेशनकार्ड वर कुटुंबातील ज्यांची ज्यांची नावे आहेत त्या सर्वांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून मशीनवर अंगठा लावून घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच रेशन दुकान च्या बाहेर रांगा लावून बसावे लागत आहे. त्यासाठी लोकांना विनाकारण रेशन दुकानदारासमोर जाऊन दुकानाच्या बाहेर अनेक तास ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे रेशन दुकानच्या बाहेर अनावश्यक रांगा लागल्या जात आहेत. अशा रांगा लावून बसल्यामुळे नागरिकांना विनाकारण नाहक त्रास होत आहे.
सामान्य जनतेला होणारा हा त्रास टाळण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी रेशन दुकानदार यांच्याकडे दुकानावर जाण्याऐवजी प्रत्यक्ष रेशन दुकानदारानेच घरोघर जाऊन हे ekyc इकेवायसी करणे सर्वांच्या दृष्टीने सोयीची आहे.
ईकेवायसी करण्यासाठी रेशन दुकानावर विनाकारण तासंतास लोकांच्या रांगा लावून नागरिकांना ताटकळत ठेवण्यापेक्षा रेशन दुकानदारांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन ही प्रक्रिया करून घेण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तसे आदेश काढावेत अशी मागणी लोकाधिकार संघाच्या वतीने लोकाधिकारप्रमुख माननीय श्री व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणि महाराष्ट्र शासनाच्या अन्नपुरवठा विभागालाही पाठविण्यात आली असून रेशन दुकानदाराने घरोघरी जाऊन इकेवायसी करण्याबाबतचे आदेश शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करावेत अशी मागणी लोकाधिकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या