कर्मयोगी आबासाहेब चित्रपटातून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व

 कर्मयोगी आबासाहेब चित्रपटातून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व



अनिकेत विश्वासराव स्व. गणपतराव देशमुख यांच्या भूमिकेत



बीड प्रतिनिधी :- आमदार खुर्चीवर बसण्यासाठी नसतो तर तो जनतेच्या सेवेसाठी जनसेवक असतो ही टॅग लाईन घेऊन येत असलेला कर्मयोगी आबासाहेब हा मराठी-हिंदी चित्रपट आमदार आणि दोन वेळा मंत्री राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या जिवनावर आधारित आहे. हा मराठी-हिंदी चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर २०२४ रोजी जगभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती मायका माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंटचे मारुती तुळशीराम बनकर आणि बाळासाहेब महादेव एरंडे यांनी केली असून रिलायन्स एंटरटेनमेंट सारखी नावाजलेली कंपनी हा चित्रपट सादर करीत आहे.

स्व. गणपतराव देशमुख वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मले होते. ते सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. त्यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला "कर्मयोगी आबासाहेब" हा चित्रपट २५ ऑक्टोबरला मराठी आणि हिंदी भाषेत जगभर रिलीज होत आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहेमद देशमुख,  वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजदखान शेख, प्रोडक्शन मॅनेजर सौरभ फुलझाडे , प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख, पोस्ट प्रोडक्शन मॅनेजमेंट अविनाश जाधव यांनी काम पाहिले आहे. आबासाहेबांचे जीवनचरित्र येत्या २५ ऑक्टोबर पासून या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या