पालम तालूक्यातील ग्राम रोजगार सेवकाचे,खुर्ची टेबल व कपाट,वितरण करणाराच्या घशात,विचारपुस केली तर;रोजगार हमी कार्यालयातील अधिकारी ठेवतात कनावर हात,
पालम प्रतिनिधीं :- महाराष्ट्रांत महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजनेची अमलबजावणी २००५ साली करण्यात आली,कामे पारदर्शकता व व्यवस्थित पार पाडण्यात यावी, याकरता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये, ग्राम रोजगार सेवकाची निवड करण्यात आली, परंतु रोजगार सेवकांना कमाची कागदपत्रांची व्यवस्था व्हावी यासाठी, २०२३-२४ या वर्षात, शासनाने, ग्राम रोजगार सेवकांना, टेबल, खुर्ची, कपाट देण्याचें ठरवले, व बऱ्याच ग्राम रोजगार सेवकांना मिळाले ही, पण बऱ्याच रोजगार सेवकांना सदर साहित्य देण्याचें टाळून ज्यांना वितरण करण्यासाठी, नियुक्त्या केल्या त्यानिच हे साहित्य लाटले,सहित्या विषयी चौकशी केली असता, प्रत्येक वेळी मिळून जाईल, हेच उतर मिळत,साहित्य मात्र मिळणे दुर्लभच,त्या व्यक्तीचा संपर्क नंबर ७७७४०७o४४८ हा आहे, प्रत्येक वेळी फोन केला असता, मिळून जाईल चौकशी चालू आहे, येवढेच उत्तर मिळते, याचा अर्थ काय समजावा, ग्राम रोजगार सेवकाचे खुर्ची टेबल कपाट या वस्तू विकून घशा खाली घातल्याचा संशय निर्माण होण सहाजीक आहे, माननिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, ग्राम रोजगार सेवकाना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची, कागदपत्रांची व्यवस्था व्हावी, व दस्ताऐवज सुरक्षित राहावे म्हणून, खुर्ची टेबल व कपाट देण्याचें ठरवले, परंतु वितरण करणारांनी,ग्रामीण भागातील परस्तितीचा गैर फायदा घेऊन, सदर साहित्य लंपास केले व आता विचारणा केली असता, मिळून जाईल चौकशी चालू आहे असा दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तरी सदर प्रकरणाची संबंधित कार्यालयाने लक्ष देऊन, विचारणा करावी व योग्य कारवाई करावी व उर्वरीत ग्राम रोजगार सेवकांना सदर साहित्य प्राप्त करून द्यावी अशी,सदर रोजगार सेवकाची मागणी आहे,
0 टिप्पण्या