जो तो म्हणतोय मीच खरा विकासाचा धनी,गंगाखेड करांना प्यायला मिळणा पाणी,
गंगाखेडकरांची यावर्षीची दिवाळी बिगर पाण्याची
गंगाखेड प्रतिनिधी :- शहरातील पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले असून दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपलेला असताना सुद्धा अजूनही शहरातील कित्येक भागांना मागील दहा ते बारा दिवसापासून पाणीपुरवठा झालेला नाही आणि हे सर्व केवळ नियोजना अभावी. विशेष म्हणजे यावर्षी मासोळी धरण 100% भरून ओव्हर फ्लो झालेले असताना सुद्धा, केवळ नगरपालिकेच्या ढिसाळ प्रशासकीय कारभारामुळे व पाणीपुरवठा चे योग्य नियोजन न झाल्यामुळे अगदी आज लक्ष्मीपूजनाचा दिवस उजाडला तरी सुद्धा गंगाखेड शहरातील कित्येक भागांना अजूनही पाणीपुरवठा झालेला नाही, विशेष म्हणजे मागच्या पंधरा दिवसांपूर्वीच मुख्याधिकारी यांनी शहराला दर चार दिवसाआड 40 मिनिटे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या असताना सुद्धा आज पंधरा दिवस झाले तरी शहरवासीयांना पाणी पुरवठा झालेला नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी ऐन दिवाळीमध्ये भटकंती करावी लागत आहे तरी ताबडतोब नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व विभाग प्रमुखांनी याची तात्काळ दखल घेत बाकी सर्व कामे सोडून शहरातील सर्व भागातील नागरिकांना कसा पाणीपुरवठा करता येईल याचे युद्धपातळीवर नियोजन करून तात्काळ पाणीपुरवठा करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
0 टिप्पण्या