डोंगरगाव शेतातील तब्बल पावने दोन क्विंटल गांजा पोलिसांकडून जप्त ! खुलताबाद पोलीसाची मोठी कामगीरी......
वर्ताकन मुनिर शाह बाजार सावंगी :- डोंगरगाव शेतातून तब्बल पावने दोन क्विंटल गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून एका शेतकऱ्याला अटक केली आहे..
डोंगरगाव (शिव) ता. फुलंब्री. पोलिस क्षेत्र खुलताबाद पोलिस ठाण्यांतर्गत डोंगरगाव शिवारात कचरु जारवाल या शेतकऱ्याने शेत गट क्रमांक ३१व४४ अद्रक व कापसाच्या शेतालगत गांजाची लागवड करुन झाडी मोठी केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. यावरून कोम्बिंग ऑपरेशन राबवून पथकाने तातडीने डोंगरगाव शिवारातील शेतात छापा मारुन ३७ व४४ झाडी पावणे दोन क्विंटल गांजा जप्त केला.
जवळपास साडेआठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष ताब्यात घेतला असून संबधित शेतकऱ्यास अटक केली आहे.
दरम्यान, सद्या विधानसभा निवडणुका प्रक्रिया सुरू आहे. यात अमली पदार्थ अवैध धंदे यावर प्रतिबंधसाठी पोलिस अधीक्षक ग्रामीण विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलिस उपाविभागीय अधिकारी डॉ. ठाकुरवाड यांच्या आदेशावरून जिल्हा तथा तालुकाभर कोम्बिंग ऑपरेशन प्रक्रिया सुरू आहे. खुलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, दुरक्षेत्र पोलिस चौकीचे जमादार नवनाथ कोल्हे, दिलीप बनसोड, जयश्री बागुल, राहुल ठोंबरे, विष्णु मुळे, संतोष पुंड पथकाने कारवाई यशस्वी केली.
0 टिप्पण्या