नियतीने दोन्ही पाय हिरावले मेंदू नाही!चमत्कार म्हणावा का साक्षात्कार!

 नियतीने दोन्ही पाय हिरावले मेंदू नाही!चमत्कार म्हणावा का साक्षात्कार!



शेख सादेक़ यांनी लिहिले निवडून कसे यावे? पुस्तक अत्तार वेल्फेअर ट्रस्ट कडून भेट

बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्याच्या जवळ असलेल्या परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील उखळी बुद्रुक या गावचे रहिवासी असलेले शेख सादेक इब्राहिम यांचे दिनांक ४ जानेवारी २०१५ रोजी रेल्वे अपघातात दोन्ही पाय कायमचे जाऊन शारीरिक दृष्ट्या शंभर टक्के अपंगत्व आले. ते सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील डिकसळ या गावी वास्तव्यास आहेत. अपघातानंतर अपंगत्व आले असले तरी बीए राज्यशास्त्रात करून डीएड ची पदवी घेणारे शेख सादेक यांनी पायाने अपंगत्व आले म्हणून काय झाले? मेंदू चांगला आहे याचा प्रत्यय आणून देत आपल्या अथांग मेहनतीतून, निरीक्षणातून व अभ्यासातून निवडून कसे यावे? हे राजकारणावर आधारित पुस्तक लिहीले. हे पुस्तक वाचल्यानंतर बीड येथील अत्तार वेल्फेअर ट्रस्टचे सचिव अकबर अत्तार यांना ते प्रचंड आवडले. या पुस्तकाचा लाभ वृत्तपत्रात लिखाण करताना कामी यावा, उपयोगी पडावा म्हणून त्यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांना सप्रेम भेट दिले. यावेळी साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेसचे मुख्य संपादक शेख एजाज़ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुस्तकाचे लेखक शेख सादेक यांनी हे पुस्तक लिहिताना नैतिक राजकारणाचा प्रचार व प्रसार करणे. उमेदवारास निवडणूक जिंकण्याविषयी योग्य ते मार्गदर्शन करणे. सामान्य व्यक्ती, महिला, विद्यार्थी व मतदारास निवडणूक प्रक्रिया समजून सांगणे. राजकारणापासून दूर जात असलेल्या होतकरू तरुणांना समाज विकासासाठी राजकारणाकडे आकर्षित करणे. समाजाचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे. मतदार व कार्यकर्त्यांना जागृत करणे. निवडणुकीतील पैशांचा अपव्यय टाळणे. निवडणुकीतील गैरकृत्य व षडयंत्राला आळा घालून पोलीस व प्रशासनास सहकार्य करणे. नैतिक राजकारणी तयार करून राज्याचा व देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे. कार्यकर्त्यांचा होत असलेला गैरवापर थांबवणे इत्यादी उद्देश समोर ठेवून लिहिलेले आहे. तसेच शासन-प्रशासनासह राजकारणातील अनेक माहिती आणि बारकावे यात समाविष्ट केलेले आहे. म्हणून अकबर अत्तार यांनी हे पुस्तक एस.एम. युसूफ़ यांना सप्रेम भेट दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या