प्रभाकर शेंडगे यांच्या तत्परतेमुळे भोगलगावचे विद्यार्थी पोहचले सुरक्षित घरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू ; "भाऊ आमचा पाठीराखा"
भूत प्रतिनिधी :- तालुक्यातील भोगलगाव येथील काही विद्यार्थी भूम शहरातील रवींद्र हायस्कूल येथे शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी सायंकाळी पाच वाजता भूम आगारातून भोगलगाव येथे बस जाते. परंतु दिनांक २१ सप्टेंबर रोजी सदरीत बस वेळेच्या आधीच निघून गेली. यातच पावसाचा जोर वाढल्याने विद्यार्थ्यांना घरी जाण्याची चिंता सतावू लागली. यामधील काही विद्यार्थी बस गेल्याने रडू लागले.
बस स्टॅन्ड वर असलेले प्रवासी सोनम बनसोडे व विकास बाबर यांनी विद्यार्थिनी का रडू लागली याची चौकशी केली व झालेली घटना समजून घेतली.
यांनी तात्काळ युवा सेना शहर प्रमुख तथा संस्थापक प्रा. डॉ. तानाजीराव सावंत युवा मंच प्रभाकर शेंडगे यांना याबाबत सांगितले. प्रभाकर शेंडे यांनी तात्काळ बस स्टॅन्ड वर जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करत त्यांना धिर दिला. शेंडगे यांनी बस आगर प्रमुख दिपक लांडगे यांच्याशी चर्चा करून तात्काळ विद्यार्थ्यांसाठी भोगलगावला बस सोडण्याची विनंती केली. आगर प्रमुख लांडगे यांनीही कसलाही विलंब न करता पुन्हा त्याच मार्गाने बस सोडण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. सदरील विद्यार्थ्यांनी "भाऊ आमचा पाठीराखा " म्हणून संबोधिले. प्रभाकर शेंडगे यांच्या तत्परतेने विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले.नागरिकांना रुग्णालय, शासकीय कामकाज, विद्यार्थ्यांना शाळेसंबंधी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अडचण आली तर संपर्क करावा असे म्हटले आहे.
0 टिप्पण्या