अखिल भारतीय ग्राम पंचायत परभणी जिल्हा संघटन मंत्री पदी भगवान करंजे यांची नियुक्ती
पालम प्रतिनिधी :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ. विलास मोरे व परभणी जिल्हा अध्यक्ष गुलाबराव शिंदे यांच्या हस्ते भगवान करंजे यांना परभणी जिल्हा संघटन मंत्री पदांचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
परभणी येथे जिल्हा शाखेच्या नविन कार्यकारणी निवडीसाठी जिल्हा अध्यक्ष गुलाबराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीत पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवानराव करंजे यांचे ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यानी मागील दहा वर्षापासून तालुक्यात काम करतात. त्यांनी आजपर्यंत शासनाच्या स्वस्त धान्य योजनेपासून वंचित असलेल्यांना रेशन कार्ड मिळवून देणे, विज बिल, बँकेतील कर्ज प्रकरण, पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळवून देणे आदी त्यांचे कामांची दखल घेण्यात आली, तसेच त्यांच्यावर पालम तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली असली तरी देशातील ग्राहक मात्र शोषणातून मुक्त झाला नाही. दैनंदिन जीवनात बाजारात वस्तू खरेदी विक्री व्यवहारातून ग्राहकाची फसवणूक होत असून शासकीय यंत्रणेत भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. यास आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ग्राहकांच्या संरक्षणासाठी कायदा केला आहे. त्याचा उपयोग घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देश पातळीवर प्रशासनासोबत समन्वय ठेवून ग्राहक हिताचे काम करते.
परभणी जिल्ह्यात ग्राहक चळवळीचे संघटन मजबूत करण्यासाठी संघटन मंत्री म्हणून भगवान करंजे यांची निवड केली आहे.त्यांच्या निवडी बदल मोतिराम शिंदे,धोंडीराम कळंबे,गोविंद सोलेवाड, बालासाहेब फुल पगार अॅड. झुंजारे,महेश करंजे, राम गावंडे,सुरेश सोनटक्के, यांच्यासह पालम मित्र मंडळीच्या वतीने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. .
0 टिप्पण्या