आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब् ग्रामरोजगार सेवकांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतील,अशी अशा नाही तर खात्री असल्याचे रोजगार सेवकाचा दावा.
पालम प्रतिनिधी :- ग्रामीण भागात गोरगरीब कुटुंबीयांकरीता उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेची अमलबजावणी केली होती, पुढे त्याच रोजगार हमी योजनेचे ग्राम रोजगार हमी योजना असे नाव देऊन, दोन हजार पाच मध्ये, कामाला गती व पारदर्शकता यावी यासाठी, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली,
सुरूवातीला अकुशल कामाच्या देयकाच्या ०.७५ % ईतके ग्रामरोजगार सेवकांला मानधन म्हणून,रक्कम देण्यात येत होती, पुढे शासनाने अर्थीक चढ उताराचा अंदाज करुन, ३%,४%,व ६% असे मानधन म्हणून तरतूद केली, परंतु महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची वाढती कामे व जबाबदारी लक्षात घेतले तर,ग्राम विकास हा ग्राम रोजगार हमी योजनेतूनच करणे हितावह आहे, कारण मजूरांना काम व गावातील जनहिताची कामे या दोन गोष्टी साध्य होतात,
महाराष्ट्र राज्य हे रोजगार हमी योजनेचे उगमस्थान असूनही इतर राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना मासिक वेतन दिल्या जात आहे, महाराष्ट्रातील रोजगार सेवकाचा अजूनही शासनाकडून कायमस्वरूपी विचार केला जात नाही, या सर्व बाबीचा विचार करुन, पालम तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी, आपले मासिक २० हजार वेतन व कुशल कामातील २% मानधन मिळावे म्हणून, गंगाखेड विधानसभा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब यांच्याकडे धाव घेतली, कारण कार्य कुशलता व माणूसकिची जानिव असणारे व्यक्तिमत्व असल्याने, माननिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब रोजगार सेवकाचा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील आशी आशा नाही तर, खात्री अहे, असे उद्गार,ग्राम रोजगार संघटनेचे अध्यक्ष श्री राजधर भोसले यांनी माध्यमाशी बोलतांना व्यक्त केले. यावेळी तालूक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक, आमदार निवसावर माननिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब यांच्याकडे भेटीसाठी उपस्थित होते.
0 टिप्पण्या