रोजगार सेवकानो जागे व्हा रात्र वैऱ्याची आहे,सर्व एक व्हा यंत्रना भैऱ्याची आहे.

रोजगार सेवकानो जागे व्हा रात्र वैऱ्याची आहे,सर्व एक व्हा यंत्रना भैऱ्याची आहे. 



संपादकिय :- महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्याध्यक्ष आपण जे आपल्या मानधनासाठी काम करत आहात त्याबद्दल आपलं राज्यभरातल्या ग्रामरोजगार सेवकांच्या वतीन मनःपूर्वक आभार 



परंतु महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून 0.75 टक्के होती तेव्हापासून आजपर्यंत ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करणाऱ्यांना,निवडून आलेले पॅनल किंवा ग्रामसेवक हे राजकीय द्वेषापोटी किंवा गावगाड्यातील इतर उद्देशाने,प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात ग्राम रोजगार सेवकांना काढण्यात प्रयत्न मोठ्या प्रमाणात काम चालू आ हे,



 त्या बाबत आपण ठोस असा निर्णय का घेत नाहीत, पगार आजचा ना उद्या होईल परंतु,रोजगार सेवक कार्यरत असला पाहिजे,याची दक्षता घ्यावी अशी सर्व रोजगार सेवकाची,आपणास विनंती आहे.

काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य,सरपंच व इतर गावगुंड खोटे कामे कर अन्यथा काढून टाकू अशा धमक्या देतात,खोटे आरोप करुन काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  

प्रत्येक तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये ज्या रोजगार सेवकरांना त्रास होतो,त्या तालुक्यातील सर्व रोजगार सेवक मिळून आंदोलन करून,आपल्या संघटनेची ताकद दाखवन गरजेचं आहे. तरच आपल्या रोजगार सेवकांना काढण्यासाठी वेगळ्या दृष्टीने कोणी बघण्याच धाडस करणार नाही,तरी सर्व राज्यातील पदाधिकारी,अध्यक्ष यांनी रोजगार सेवक कुठलाही असो,या बाबत सर्वांनी उठाव करावा,रोजगार सेवकांना ग्रामसभेमार्फत काढता येणार नाही अशा पद्धतीने ठोस निर्णय घ्यावा.जय मनरेगा,जय रोजगार हमी.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या