पेठशिवणी येथे वृक्षारोपण,परिस स्पर्श फाउंडेशनने राबविला अभिनव उपक्रमाचे
पेठशिवणी प्रतिनिधीं : - वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. पालम तालुक्यातील पेठशिवणी येथील परिस स्पर्श फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने जि.प.हायस्कूल, मुरुडेश्वर महाविद्यालय परिसर व बस स्टॉप ते साईबाबा मंदीर या मुख्य रस्त्यावर झाडांची लागवड करण्यात आली. सप्तपर्णी, करंजी, अशोक, पिंपळ, जांभूळ, आवळा, वड इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली असून ही झाडे नुसती न लावता त्यांचे संवर्धन करन्याचे नियोजन केले आहे. गावातील घरासमोर झाडे लावून त्यांना ती झाडे दत्तक देण्यात आली असून त्यामुळे त्या झाडांचे संवर्धन होऊन गावात हिरवळ होईल.
फौंडेशनच्या वतीने एक मूल एक झाड, वृक्ष दत्तक योजना आदी उपक्रम सातत्याने राबविले तर नक्कीच गावाचे नंदनवन होईल यात काही शंका नाही. हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक जोशी सर, मन्मथ बरडे सर, संजय झुरूळे सर, डॉ.धोंडिराम गडगिळे सर, दत्ता डोके सर,राजू फुलारी,शिवहार वाडेवाले सर, दासराव बरडे, भालचन्द्र गुंठे सर,चंद्रकांत अष्टुरकर सर,गोपिनाथ शिनगारे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाचे तालुक्यातून व गावातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या