पाथरूड उपकेंद्र नॅशनल हेल्थ सिस्टिम रिसोर्स सेंटर (एनकॉस) मूल्यांकन मध्ये प्रथम.

 पाथरूड उपकेंद्र नॅशनल हेल्थ सिस्टिम रिसोर्स सेंटर (एनकॉस) मूल्यांकन मध्ये प्रथम.

तानाजीराव सावंत युवा मंचच्या वतीने अधिकारी कर्मचारी, आशा सेविकांचा सन्मान.



धाराशिव भिम प्रतिनिधी :- तालुक्यातील  पाथरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने नॅशनल हेल्थ सिस्टिम रिसोर्स सेंटर (एनकॉस) मूल्यांकन मध्ये भूम तालुक्यातुन  मानकेश्वर, ईट, वालवड, आंबी, पाथरूड या पाच उपकेंद्रामधून  प्रथम तर धाराशिव जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल  आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, तानाजीराव सावंत युवा मंच महा राज्य संस्थापक अध्यक्ष प्रभाकर शेंडगे यांच्या वतीने दिनांक २ रोजी पाथरूड आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 

एनकॉस मूल्यांकन मध्ये क्रमांक मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे  आरोग्य अधिकारी डॉ गायकवाड  मॅडम, डॉ पोत्रे सर,  आरोग्य समुदाय अधिकारी  डॉ गणेश नागरगोजे, औषध निर्माण अधिकारी दराडे सर, आरोग्य सहाय्यक मडके सर,  आरोग्य  सहायिका पाटील मॅडम, गट प्रवर्तक गायकवाड मॅडम, आरोग्य सेविका बागडे मॅडम, लिपिक शिंदे मॅडम, ऑपरेटर डोंबाळे सर , परिचर खुलगे मामा, आशा सेविका यांचा  फेटा, शाल, पुष्पगुछ व पेढे भरवून सन्मान करण्यात आला. 

यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गिते,  साखर सम्राट रामकिसन जाधव, शिवसेना तालुका संघटक वैजनाथ म्हमाने, शिवसेना उप तालुकाप्रमुख सुग्रीव मुरूमकर, शिवसेना विभाग प्रमुख बापू टिकटे, पोलीस पाटील  नवनाथ भसाड,  युवा मंचाचे अमोल भसाड, विकास बाबर, अमोल पारेकर,  तानाजी पवार, दिगंबर गव्हाणे, बालाजी फाळके   सह अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्त्यां, नागरिक उपस्थित होते. 

मनोबल वाढले असून दर्जेदार सेवा देऊ.

एनकॉसच्या  गेल्या दिड वर्षांपासून मेहनत सुरु होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मुल्यांकन होत आहे. यातून पुरविलेल्या सेवा दाखविण्यास वाव मिळाला आहे.  जेवढा एमबीबीस पास झाल्यावर आनंद झाला नाही तेवढा मानांकन मिळाल्याने झाला. यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली व सर्व कर्मचारी यांनी मिळून मेहनत घेतली व ग्रामस्थांची साथ मिळाली त्याचे यश आहे. आमच्या यशाचा सन्मान केल्याबद्दल प्रा डॉ तानाजीराव सावंत युवा मंचाचे आम्ही आभारी आहोत.

समाजात चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज घेत असतो. वेगवेगळे पुरस्कार  किंवा सन्मान देऊन त्यांचा गौरवही केला गेला पाहिजे.सन्मान केल्याने कर्तृत्व मिळणाऱ्या व्यक्तीचा गौरव होतो, तर इतरांना चांगले काम करण्याची नेहमी प्रेरणा मिळते. तानाजीराव सावंत युवा मंचच्या वतीने कर्तृत्ववान अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, महिला व व्यक्तींचा सन्मान केला जातो. 

आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्यामुळे आरोग्य विभागाला नवी दिशा व गती मिळाली आहे. त्यांनी रुग्णालयांना भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. पाथरूड उपकेंद्रातील  आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशाताई या आपले कुटुंब समजून मेहनत घेत असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देत आहेत. त्याचेच हे फळ आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या