क्रांती दिनी शेतकरी संघटना व भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने पुणे येथे विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा.
लातूर प्रतिनिधी :- गायीच्या दुधाला डिझेल प्रमाणे तर म्हशीच्या दुधाला पेट्रोल प्रमाणे दर द्यावा, दोन साखर आणि इथेनॉल कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करावी, शेतीमालावरिल निर्यातबंदी कायमची रद्द करावी,पीक विमा कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन योजना लागू करावी,आजी माजी आमदार खासदारांची पेन्शन रद्द करावी या मागणीसाठी 9 ऑगस्ट 2024 रोजी विभागीय महसूल आयुक्तांच्या विधानभवन येथील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी दिली.यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजी नांदखिले, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, युवा आघाडी प्रमुख मिथुन दिवे, मराठवाडा अध्यक्ष आनंद जीवणे लातूरचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे जिल्हा कार्याध्यक्ष संजय देवापा उपस्थित होते.
या बैठकीमध्ये शेतकरी संघटना व भारतीय जवान किसान संघटनेचे पदाधिकाऱ्यांची लातूर येथे निवड करण्यात आली. शेतकरी संघटनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख पदी श्रीपती दरेकर साहेब, मराठवाडा विभागीय अध्यक्ष कालिदास भंडे , युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सत्यदेव गरड, भारतीय जवान किसान पार्टी जिल्हाध्यक्ष पदी कॅप्टन नंदकुमार जगताप यांची निवड करण्यात आली.9 ऑगस्ट 2024 रोजी माजी सैनिक आणि शेतकऱ्यांनी पुणे येथील विधानभवनावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या