पिक कर्ज व्याज परतावा व पिकवीमा संदर्भात तहसीलदार सोबत शेतकरी संघटनेची बैठक.
लातूर प्रतिनिधींना :- शेतकरी संघटना व देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने देवणी येथील तहसीलदार साहेबांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले होते त्यातील प्रमुख मागणी 2023 24 मधील विमा लागू करण्यात यावा 2024 मध्ये खरीप हंगामातील सोयाबीन पिकांचे देवणी तालुक्यातील अंदाजे 9600 लोकांचा पंचनामा करण्यात आला.
सलग 21 दिवसाचा पावसाचा खंड असताना विमा कंपनीने तीन मिलिमीटर पाऊस पडले असे कारण पुढे करत विमा देण्यास नाकारले तीन मिलिमीटर पावसामुळे साधा रस्ता सुद्धा भिजत नाही एवढा कमी पर्जन्यवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्यावर विमा कंपनी व प्रशासनाने अन्याय केला आहे त्या मागणीसाठी देवणी तालुक्यातील शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले होते .
2021 पासून ते 2024 पर्यंत शेतकऱ्यांना राज्य शासन व केंद्र शासन ना कडून मिळणाऱ्या पीक कर्जाच्या व्याज परताव्याचा लाभ अद्याप मिळाला नाही राष्ट्रीय करत बँक ग्रामीण बँक जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी दुहेरी पद्धतीने व्याज वसूल केली आहे या विषयी हा शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय आहे अगोदर शेतकरी कर्जाच्या डोंगरांमध्ये होरपळून जात आहे वरून प्रशासन त्यांना न्याय न देता त्यांच्यावर अन्याय करत आहे प्रशासनाने शेतकऱ्यावर होणाऱ्या पिक विमा व पीक पीक कर्जाचा व्याज परतावा शेतकऱ्यांना मिळाला नाही याकडे प्रशासन डोळेझाक करत आहे हा होणाऱ्या अन्याय थांबला पाहिजे अन्यथा शेतकरी संघटना ही तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा आज शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. आजच्या बैठकीमध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी पिक विमा पीक कर्ज व्याज परतावा व इतर अन्य मागण्यांसाठी देण्यात आलेल्या नियोजनाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची आश्वासन दिले याप्रसंगी या बैठकीमध्ये शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे ,मराठवाडा अध्यक्ष आनंद जीवने पृथ्वीराज पाटील ,राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे देवणी तालुका अध्यक्ष अमरनाथ मुर्के ,भाजपा चे तालुका अध्यक्ष सुखानंद काळ शेट्टे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते कालिदास भंडे , शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीमंत आना लुले जिल्हा कार्याध्यक्ष योगेश तगरखेडे बदनालचे दंडे साहेब व पर्भू आना चेतन मिटकरी युवराज अण्णा बिरादार शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जी शिवगे देवणी तालुका शिवा संघटना अध्यक्ष मिलिंद सुरवंशी करीम भाई शेख शेतकरी संघटना देवणी तालुका उपाध्यक्ष अमोल जीवने रमेश बुदे बिरादार हेळंब नगरीचे माजी सरपंच रणजित सावंत साहेब, गुणवंत धनेगावे, रोहित येदले, मधुकर कुलकर्णी,संगम पताळे,कचरु शिंदे, गोविंद पाटील, रणजित शिंदे, अंगद पाटील, रामेश्वर सावंत बस्वराज सुनके, गंगाधर पाटील,असे अनेक शेतकरी देवणी शहरातून व तालुक्यातून,आदी शेतकरी उपस्थित होते. या मागण्या मान्य नाही झाल्यास येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये परत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल
0 टिप्पण्या