जीवनात गुरुची गरज - हभप. विशाल महाराज खोले.
उमरगा प्रतिनिधीं :- विश्वाला तारण्यासाठी गुरू ची सेवा करणे गरजेचे आहे श्रीगुरू आपला, उध्दार करतात असे प्रतिपादन हभप. विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांनी केले.
ते श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे श्री गुरू पौर्णिमा उत्सवात किर्तन सेवेत बोलत होते. यावेळी हभप. हभप. अवधूत पुरी महाराज, हभप. दिपक महाराज जाधव, हभप. शरद महाराज कराळी, हभप. भिम महाराज अचलबेट, हभप. हरी गुरूजी लवटे महाराज, हभप. भागवत महाराज पाचंगे, हभप. पंडित मुळे, संजय राठोड, शेखर महाराज सुर्यवंशी, सचिन जाधव, हभप. नेताजी गुरूजी जाधव, तुकाराम महाराज माने, उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, बंडू गुरूजी नेलवाडे, उमा सुर्यवंशी सर, बाळू पाटील, नरसिंग लवटे महाराज, बालाजी मोरे, जनार्दन भोसले, निळकंठ जमादार, रेणके गुरूजी आदी. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी किर्तन सेवेत पुढे बोलताना हभप. खोले महाराज म्हणाले की, गुरू चा जयजयकार करण्यासाठी गुरू परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करावे, गुरू सर्वांना समान पध्दतीने पाहतात, भक्ताने गुरू शी एकनिष्ठ रहावे, जगाच्या उध्दारासाठी ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई या संतांनी गुरू चे महत्व सांगितले आहे. कोण कोणासोबत आहे हीच संगत भविष्य ठरवते. वैचारिक पातळी ठरते. गुरू गुरू साधनेत असताना गुरूशी लिन व्हायला पाहिजे असे म्हणाले.
विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा " श्रीगुरू सारीखा असता पाठीराखा " या, अभंगांवर सुंदर विवेचन केले. गुरूच्या कृपेने चांगले विचार केला तर गुरुनिष्ठा समजते. गुरूचा महीमा पाहीला जातोय. गुरू रत्नपारखी सारखे असतात. गाजर पारखी सारखे केवळ जगात माणसे आहेत. गुरूचा उपदेश हेच गुरू प्रेम आहे. आळशी माणसावर गुरू कधीही कृपा करत नाहीत. समाज जीवन जगताना धनाने कृपा होत नाही. गुरू निष्ठाच तारते. निष्ठा, प्रेम काय असते ते पाहण्यासाठी घड्याळातील काटे फक्त अचलबेट देवस्थान याच ठिकाणी फिरतात. ही तपोभूमी असून परिसर सुंदर आहे. इच्छा पूर्ण करण्याची क्षमता गुरूमध्ये असते. गुरू हे श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे सदगुरू उज्वलानंद महाराज यांच्या रुपात या ठिकाणी आहेत.
शेवटी बोलताना म्हणाले की, उज्वलानंद बाबा गुरूस्थानी आहेत. ज्ञान देव म्हणे तरलो तरलो या ओवी प्रमाणे सदगुरू उदार असतात, गुरू शिष्याला उदार अंतःकरणाने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. गुरू उदार असतात म्हणून गुरूचा साक्षात्कार होणे गरजेचे आहे. तो साक्षात्कार सदगुरू उज्वलानंद बाबांनी पंचक्रोशीतील भक्तांवर केला आहे असे ते म्हणाले. संत कुटुंबामध्ये जन्म घेतला तर कुळीचा उध्दार होतो. गळ्यात तुळशीची माळा घाला, निर्व्यसनी रहावे असे सांगून "पिंगळा महाव्दारी" हे पिंगळा गायन करून सर्वांना मंञमुग्ध केले. यावेळी महीला पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या