पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या कर्तव्यदक्षतेला मानाचा मुजरा
रमेश गंगाधरे, एस.एम.युसूफ़ यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त करत सन्तान
बीड (प्रतिनिधी): जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्हा पोलीस दल आस्थापनेवरील पोलीस शिपाई पद भरतीसाठी लेखी परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून महिला व पुरुष उमेवारांची राहण्याची व्यवस्था केली. पोलीस अधीक्षकांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे बाहेरून येणाऱ्या तरुण-तरुणींना राहण्याचा निवारा मिळाला. यामुळे होणारे संभाव्य हाल टळले तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांकरिता निवासाची सोय करणारे नंदकुमार ठाकूर हे पहिलेच जिल्हा पोलीस अधीक्षक ठरले. त्यांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेसाठी कृतज्ञता व्यक्त करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी हृदयी सन्मान केला.
बीड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर रविवार दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता लेखी परीक्षा तेलगाव नाका येथील आदित्य कॉलेज मध्ये होती. या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार मोठ्या संख्येने बाहेर गावाचे होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, याचा विचार करुन बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी महत्वाचा निर्णय घेऊन लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या महिला उमेदवारांसाठी दिनांक ६ जुलै रोजी राहण्याची व्यवस्था पोलीस बॅरेक, पोलीस मुख्यालय नगर रोड, बीड येथे केली. तसेच पुरुष उमेदवारांची राहण्याची व्यवस्था गॅलेक्सी लॉन्स, ताज लॉन्स बार्शी नाका बीड येथे केली. या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या राहण्याची सोय करणारे नंदकुमार ठाकुर पहिलेच जिल्हा पोलीस अधीक्षक ठरले. शिवाय उमेदवारांना पूर्वीसारखा होणारा त्रास टळला. यामुळे लेखी परीक्षेच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे आणि एस.एम.युसूफ़ यांनी कृतज्ञता व्यक्त करत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा हृदयी सन्मान केला.
0 टिप्पण्या